Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे

Kim jong un meeting vladimir putin : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शस्त्र करारासंबंधिची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. द्यामुळं पाश्चिमात्य देशांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. इथं हा दौरा चर्चेत असतानाच तिथं किम जोंग यांच्या उत्तर कोरिया या देशाविषयीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे.   

Sep 12, 2023, 11:31 AM IST

Kim jong un meeting vladimir putin : उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन त्यांच्या काही विश्वासातील अधिकाऱ्यांसह रशियात पोहोचले असून, तिथं ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. 

 

1/9

प्रत्येक गोष्ट हैराण करून सोडते

Kim jong un russia visit shocking laws in north korea

उत्तर कोरियात अनेक असे नियम, कायदे आहेत जे तुम्हाला थक्क करतील. किंबहुना या देशासंदर्भातील प्रत्येक गोष्ट हैराण करून सोडते.   

2/9

किम आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्यास...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

उत्तर कोरियातील नागरिकांनी किम आणि त्यांच्या कुटुंबाशी प्रामाणिक असणं अपेक्षित आहे. असं न झाल्यास हे निंदात्मक कृत्य करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा केली जाते. सर्व नागरिक आणि पर्यटकांना हा नियम लागू आहे.   

3/9

रोज रात्री वीजपुरवठा खंडित...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

विद्युत संकटामुळं उत्तर कोरियामध्ये रोज रात्री वीजपुरवठा खंडित होतो. इथं वीजेच्या वापरासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक असून, मायक्रोवेव वापरणं बेकायदेशीर आहे.   

4/9

तीन पिढ्यांना शिक्षा...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

उत्तर कोरियामध्ये कोणीही कोणताही गुन्हा केल्यास फक्त गुन्हेगार व्यक्तीच नव्हे तर, त्यांच्या तीन पिढ्य़ांना शिक्षा सुनावली जाते. परदेशी चित्रपट किंवा गाणी पाहणं आणि ऐकणं येथील शासकांना मान्य नाही, तशी परवानगीही नाही. असं करणाऱ्यांना थेट कारावासाची शिक्षा होते.     

5/9

शासन सांगेल तोच हेअरकट...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

2013 मध्ये उत्तर कोरियात एक नवा कायदा आला. जिथं महिला किंवा पुरुष शासनानं दिलेल्या 28 हेअरकट पर्यायांपैकी एकाचीच निवड करु शकतात. यामध्ये महिलांसाठी 18 हेअरकट आणि पुरुषांसाठी 10 हेअरकटची तरतूद आहे. बरं यामध्ये खुद्द किम जोंग यांच्या हेअरकटचा समावेश नाही, जेणेकडून त्यांचा अंदाज अनोखाच राहील.     

6/9

विद्यार्थ्यांकडून शाळेतील बाकांचे पैसे

Kim jong un russia visit shocking laws in north korea

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बाकांचे आणि खुर्च्यांचे पैसेही पालकांनीच भरावेत असा नियम उत्तर कोरियामध्ये आहे. शालेय फीमध्ये याचा समावेश नाही. जाणून आश्चर्य वाटेल पण देशाच्या राजधानीमध्ये फक्त प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींनीच राहण्याचा अजब नियम इथं आहे. किंबहुना इथं वास्तव्यासाठी किम जोंग याची परवानगी घेणं अपेक्षित असतं.   

7/9

स्वत:चं कॅलेंडर...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

उत्तर कोरिया स्वत:चीच दिनदर्शिका पाळतं. ज्याला Juche Calander असं म्हणतात. या दिनदर्शिकेची सुरुवातच 15 एप्रिल 1912 पासून होते. किम II सुंग यांच्या जन्मतिथीचाच हा दिवस आहे. 

8/9

बायबलवर बंदी

Kim jong un russia visit shocking laws in north korea

बायबल हे पाश्चिमात्य रुढी आणि विचारसरणीचं प्रतीक असल्याचं म्हणत उत्तर कोरियामध्ये त्यावर बंदी आहे. 2014 मध्ये इथं नाताळसणाच्या वेळी बायबल वाटणाऱ्या एका महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली दिली गेली होती.   

9/9

फोनला बंदी...

Kim jong un russia visit shocking laws in north korea

उत्तर कोरियामध्ये असाल तर परदेशात फोन करणं विसरुन जा. कारण इथं तसं करणं गुन्हा आहे. कायद्यानुसार देशातील कोणताही नागरिक विनापरवानगी देश सोडू शकत नाही. अन्यथा त्यांना जागीच मृत्यूची शिक्षा दिली जाते.