Ertiga, Innova ला विसरा! या 7 सीटर कारचा भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ; 1.5 लाख लोकांनी केली खरेदी

Best 7 Seaters Car in India: या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.   

Shivraj Yadav | Jun 03, 2024, 17:44 PM IST

या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 

 

1/9

भारतीय बाजारपेठेत नेहमीच जास्त स्पेस आणि सीट्स असणाऱ्या गाड्यांची मागणी असते. यासाठी एमपीव्ही कारना जास्त पसंती दिली जाते.   

2/9

या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.   

3/9

Kia Carens ने आपला आकर्षक लूक आणि दमदार फिचर्सने एक वेगळा रेकॉर्ड केला आहे.   

4/9

किआ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या कारच्या 1.5 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. जी या कारचं यश दर्शवते.   

5/9

फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने Kia Carens ला सर्वात प्रथम भारतीय बाजारपेठेत लाँच केलं होतं. ही कार 6 आणि 7 सीटर अशा दोन्हीत उपलब्ध आहे.  

6/9

पेट्रोल आणि इंजिन अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असणाऱ्या या कारची किंमत 10.52 लाखांपासून सुरु होते आणि 19.67 लाखांपर्यंत जाते.  

7/9

जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त ग्राहकांनी Kia Carens च्या हायर आणि मिड लेव्हल व्हेरियंटला निवडलं असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यामध्ये सनरुफ, वेंटिलेटेड सीट्ससारखे फिचर्स मिळतात.   

8/9

तसंच 57 टक्के ग्राहकांनी पेट्रोल व्हेरियंट निवडलं असून, उर्वरित 43 टक्के लोकांनी ड़िझेल व्हेरियंट खरेदी केलं आहे.   

9/9

ही कार 6 स्पीड मॅन्यूअल, 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. जवळपास 62 टक्के ग्राहकांनी मॅन्यूअल व्हेरियंटची निवड केली आहे.