जगाच्या विनाशाचे संकेत देणार महाराष्ट्रातील रहस्यमयी शिव मंदिर! तीन खांब तुटलेत आता शेवटचा एक खांब तुटला की...

 Kedareshwar Cave Temple : मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  पवित्र नदीच्या काठावर  रहस्यमयी केदारेश्वर गुहा मंदिर आहे. 

Sep 02, 2024, 18:15 PM IST

Kedareshwar Cave Temple, Harishchandragad Fort in the Ahmednagar : हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे. गुहेत कमरे इतके पाणी असून पाण्यात शिवलिंग आहे. पाणी अतिशय थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहचणे अत्यंत कठीण आहे. पावसाळ्यात प्रचंड वेगाने  पाणी वाहते यामुळे गुहेपर्यंत पोचणे  अशक्य  असते.

1/7

 जगाच्या विनाशाचे संकेत देणार रहस्यमयी शिव मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे. 

2/7

मंदिरातील शिवलिंग सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. 5 फूट एवढे म्हणजेच कमरेपर्यंत पाणी आहे. 

3/7

मळगंगा म्हणून ओळखल्या जाणार्याे पवित्र नदीच्या काठावर हे मंदिर आहे. मंदिराचे पाणी थेट मंदिरात शिरते.  मंदिराच्या अरुंद प्रवेशद्वाराच्या पलीकडे गुहेचे एक रमणीय दृश्य दिसते. गुहेतील या मंदिरात एक स्वयंप्रकट शिवलिंग आहे.   

4/7

या चारही खांबांचा सखोल अर्थ आहे. हे चार खांब चार युगांचे चार प्रतीक आहेत. सत्य, त्रेता ,द्वापार आणि कलियुग म्हणजे हे चार खांब असे दर्शवले आहे. सध्या या चार खांबा पैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल, अशी धारणा आहे.  

5/7

 हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम अविष्कार आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर चार खांबावर उभे होते. आता मात्र, तीन खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे. 

6/7

अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या हरिश्चंद्रगडावर हे अनोखे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अप्रतिम निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. 

7/7

अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड किल्ल्यातील भूमिगत गुहेत हे शिवमंदिर आहे.  केदारेश्वर गुहा मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.