'गरजे पंढरपूर...' कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईचे साजिरे रुप

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार आणि सौ सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली. तसेच मानाचे वारकरी श्री बाबुराव सगर आणि सौ सागरबाई सगर यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. 

| Nov 12, 2024, 12:55 PM IST

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार आणि सौ सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली. तसेच मानाचे वारकरी श्री बाबुराव सगर आणि सौ सागरबाई सगर यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. 

1/7

 कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. 

2/7

पाच लाख भाविक दाखल कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी कोकण कर्नाटक गोवा या प्रांतातून भाविक अधिक संख्येने येत असतात.

3/7

या भाविकांच्या गर्दीने पंढरपूरचा विठ्ठल मंदिर परिसर फुलून गेलेला आहे.

4/7

टाळ मृदुंग प्रासादिक विक्रीचे दुकाने तुळशीमाळा विक्रीची दुकाने या ठिकाणी खरेदीसाठी भाविकांची गर्दी झालेली आहे.

5/7

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग ही पत्रा शेड पर्यंत लांब गेलेली आहे 

6/7

 दर्शनासाठी साधारणतः आठ ते नऊ तासांचा कालावधी भाविकांना लागत आहे. 

7/7

12 तारखेच्या पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.