Karnataka Elections 2023: मतदान कधी, निकाल केव्हा लागणार... कर्नाटक निवडणुकीची A टू Z माहिती

Karnataka Election 2023: संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर. कर्नाटकवर सध्या भाजपाची (BJP) सत्ता असून यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण भारतात कर्नाटक (Karnatka) हे एकमेव राज्य भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकवर सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.

| May 03, 2023, 15:36 PM IST
1/5

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 10 मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे.  तर तीन दिवसांनी म्हणजे 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

2/5

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागा असून यंदा 36 जागा अनुसूचित जाती आणि 15 अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. 

3/5

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व तरुणांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. 

4/5

कर्नाटकमध्ये यंदा तब्बल 9 लाख 17 हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. तर एकूण मतदार 5 कोटी 21 इतके आहेत. यात 2.62 कोटी पुरुष मतदार तर 2.59 महिला मतदार आहेत. 

5/5

कर्नाटकात भाजप, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये तिरंगी लढत आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे बसवराज बोम्मई, काँग्रेसचे के डी के शिवकुमार आणि जेडीएसचे एच डी कुमारस्वामी यांच्यात चुरस आहे.