आठवड्यातील 'या' दोन दिवशी अगरबत्ती लावू नका; आर्थिक संकटासह कौटुंबिक कलहदेखील वाढेल

Agarbatti Vastu Tips: हिंदू धर्मात अगरबत्ती लावण्याला विशेष महत्त्व आहे. यासह अगरबत्ती लावण्यासंबंधी काही नियम असून, या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. यातील एक नियम म्हणजे अगरबत्ती मनाला येईल त्या दिवशी लावू नका. त्यासाठी काही दिवस ठरले आहेत.   

May 02, 2023, 22:15 PM IST
1/8

हिंदू कुटुंबांमध्ये पूजा-पाठ करताना घरांमध्ये किंवा मंदिरात अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मात अगरबत्ती लावणं निषिद्ध आहे. याचं कारण म्हणजे अगरबत्ती बांबूपासून बनविली जाते आणि सनातन परंपरेत बांबू जाळणे अशुभ मानले जाते. त्यामुळे पितरांचा क्रोध वाढून पितृदोष जाणवतो.  

2/8

पण यानंतरही अनेक घरांमध्ये अगरबत्ती लावली जाते. अशा स्थितीत अगरबत्ती लावण्यासंबंधी काही नियम आखण्यात आले आहेत. या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.   

3/8

यामधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे, दिवसानुसार अगरबत्ती लावणं. म्हणजेच अगरबत्ती कोणत्या दिवशी लावली पाहिजे आणि कोणत्या दिवशी नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. त्यामागे अर्थही दडला आहे.   

4/8

अनेक घरांमध्ये पूजा करताना आरतीनंतर अगरबत्ती लावली जाते. अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. पण खरं तर अगरबत्ती मंदिरात लावणं जास्त शुभ असतं.   

5/8

घरांमध्ये अगरबत्ती लावली जाऊ नये असं सांगितलं जातं. पण तरीही तुम्ही अगरबत्ती लावत असाल तर मग तो दिवस कोणता आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.   

6/8

हिंदू धर्मात दोन दिवशी अगरबत्ती लावू नये अशी धारणा आहे. या दिवशी अगरबत्ती लावल्यास दोषनिर्मिती होऊ शकते. रविवार आणि मंगळवार हे ते दोन दिवस आहेत.   

7/8

धार्मिक शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, रविवारी अगरबत्ती लावल्याने सूर्याची स्थिती कमजोर होते. तसंच मंगळवारी पूजेच्या वेळी अगरबत्ती लावल्याने मंगळ दोष निर्माण होतो आणि मंगळ भारी होतो. रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळला जात नाही हेदेखील एक कारण आहे.  

8/8

या दोन दिवशी बांबू जाळल्यास आर्थिक संकट निर्माण होतं आणि कौटुंबिक कलह वाढतात अशी मान्यता आहे.