Kairi Panha Recipe: उन्हाळ्याच्या दिवसात घरी बनवा कैरी पन्ह...पाहा ही सर्वात सोपी रेसिपी

उन्हाळा सुरु झाला असून प्रत्येकाला  उन्हाच्या झळा जाणवतायत. अशात कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं. 

May 22, 2023, 22:41 PM IST

Kairi Panha Recipe: उन्हाळा सुरु झाला असून प्रत्येकाला  उन्हाच्या झळा जाणवतायत. अशात कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं. 

1/5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी कैरीचं पन्ह मदत करतं. घरच्या घरी हे कसं बनवायचं ते जाणून घेऊया. 

2/5

कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारं सामान- 2-3 मध्यम आकाराच्या कैऱ्या, जीऱ्याची पूड, काळी मिरी, 100- 150 ग्राम साखर, पुदीना, काळं मीठ

3/5

पन्ह बनण्याची सोपी पद्धत- कैरीचं पन्ह बनवण्यासाठी कैरी एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा. यानंतर त्यातील त्यातील गर काढून घ्या. यामध्ये 1-2 कप पाणी घालून उकळण्यासाठी ठेवा.  

4/5

हा गर थंड झाल्यावर साखर, काळं मीठ आणि पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. या पल्पमध्ये 1 लिटर थंड पाणी घालून त्यात काळी मिरी, जिरं पावडर टाका.

5/5

यामध्ये बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. हे पन्हं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 3-4 दिवस वापरू शकता.