सोन्याची जेजुरी... भंडाऱ्याची उधळण अन् भक्तांचा उत्साह, गडावरील सोमवती यात्रेचे नेत्रदीपक PHOTOS

सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) म्हणजे भक्तांची अलोट गर्दी... भंडाऱ्याची उधळण... गडावर 'जय मल्हार...' नावाचा जयघोष... हा अनुभव भक्तांना याचि देही याचि डोळा अनुभवताना आला आहे. 

| Jul 17, 2023, 18:48 PM IST

Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) म्हणजे भक्तांची अलोट गर्दी... भंडाऱ्याची उधळण... गडावर 'जय मल्हार...' नावाचा जयघोष... हा अनुभव भक्तांना याचि देही याचि डोळा अनुभवताना आला आहे. 

1/8

सोन्याची जेजुरी... भंडाऱ्याची उधळण अन् भक्तांचा उत्साह, गडावरील सोमवती यात्रेचे नेत्रदीपक PHOTOS

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी गडावर आज भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत अमावस्या साजरी करण्यात आली.  या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. 

2/8

भंडाऱ्याची उधळण

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

सोमवती अमावस्यानिमित्त गडावर सोमवती यात्रा भरते. भंडाऱ्याची उधळण झाल्यानंतर पालखी कऱ्हा नदी पात्रात पोचल्यानंतर कऱ्हेचे अथांग पाणी आणि भाविकांची भंडाऱ्याची मुक्त उधळण अशा जल्लोषपुर्ण वातावारत कऱ्हानदीवर आज  खंडोबाच्या सोमवती स्नानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

3/8

पालखी गडावरून खाली

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

सोमवती आमवस्येनिमित्त दुपारी एक वाजताच्या सुमाऱ्यास पेशव्यांनी इशारा देताच पालखीचे प्रस्थान झाले. मंदीर प्रदक्षिणा पुर्ण करून पालखी गडावरून खाली येते. त्यानंतर कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होते.

4/8

खंडोबाच्या उत्सव

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

पालखी कऱ्हा नदी पात्रामध्ये पोचल्यानंतर खंडोबाच्या उत्सव मुर्तींना कऱ्हेच्या पाण्याने व दही दुधाने स्नान घालण्यात येते 

5/8

डोळे दिपवणारा सोहळा

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

पालखीचा हा सोहळा डोळे दिपवणारा असतो. त्यावेळी भाविकही स्नानाची पर्वणी साधतात. 

6/8

ऊन सावलीचा खेळ

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

ऊन सावलीचा खेळ आणि अधून मधून बरसणारा पाऊस अशा  अल्हाददायक वातारवणामुळे खांदेकरी मानकरींचा उत्साह दुणावला होता

7/8

दर्शनासाठी गर्दी

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

जानुबाई मंदीरात स्थानिक नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी दरवर्षी मोठी गर्दी करतात

8/8

पालखीचा परतीचा प्रवास

Jejuri Khandoba Temple Somvati Amavasya 2023 photos

स्नानानंतर पालखी रात्री उशिरा गडावर दाखल होते. देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो. रोजमुरा वाटून सोमवती यात्रेची सांगता होते