Election results 2019 : जया प्रदा बाबा लक्ष्मणयांच्या समाधीच्या दर्शनाला

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या चर्चांना उधाण आले आहे.

May 23, 2019, 15:03 PM IST

नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या चर्चांना उधाण आले आहे. सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज कोण बाजी मारणार हे निश्चित होणार आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदार संघात जया प्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये त्या बाबा लक्ष्मण यांच्या समाधीची पूजा करताना दिसत आहे.

1/5

भाजपा पक्षात प्रवेश

भाजपा पक्षात प्रवेश

जया प्रदा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर खाजदार म्हणून निवडून आल्या होत्या. आता त्यांनी भाजप पक्षाचा हात धरला आहे.

2/5

जया प्रदा विरूद्ध आजम खान

जया प्रदा विरूद्ध आजम खान

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये जया प्रदा यांची लढत  समाजवादी पक्षाचे नेता आजम खान यांच्या सोबत आहे. 

3/5

आजम खान आघाडीवर

आजम खान आघाडीवर

आजम खान हे जया प्रदा यांच्यापेक्षा १७ हजार ४९८ मतांनी पुढे आहेत.

4/5

१९९४ साली राजकारणात प्रवेश

१९९४ साली राजकारणात प्रवेश

तेलगू त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेल्या जया प्रदा यांनी १९९४ साली राजकारणात प्रवेश  केला. 

5/5

१९९४ साली आंध्र प्रदेशमध्ये केला निवडणुकांचा प्रचार

१९९४ साली आंध्र प्रदेशमध्ये केला निवडणुकांचा प्रचार

१९९४ साली आंध्र प्रदेशच्या अनेक मतदार संघातून त्यांनी प्रचार केला होता.