मुंबईत सापडलंय मोठं भूयार... फोटोमध्ये पाहा ते आतून कसं दिसतंय

जे.जे. रुग्णालय परिसरातील भूयार पाहण्यासाठी तुम्हीही उत्सुक आहात! पाहा फोटो

Nov 04, 2022, 15:03 PM IST

भूयार... भूयार म्हटलं की प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न येतात. ते भूयार कसं असेल, कोणत्या ठिकाणी असेल. किती वर्ष जुनं असेल? यांसारख्या अनेक प्रश्न भूयार म्हटलं की समोर येतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जर भूयार मुंबईत सापडलं तर? मुंबईतील जे.जे. रुग्णालय (J J Hospital) परिसरात असणाऱ्या डी.एम. पेटीट नावाच्या साधारण 130 वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक भुयार सापडलं. बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आला. ज्यामुळे त्यांनी जे.जे. रुग्णालय परिसरात भूयार असल्याचं समोर आलं. 

1/5

जे.जे. रुग्णालय परिसरात आढळलेलं भूयार जवळपास 130 वर्षे जुनं असल्याचं सांगण्यात आलं आहे.   

2/5

सर जे जे रुग्णालयाची वास्तू आणि सदरील भागामध्ये बऱ्याच ब्रिटीशकालीन (British) इमारती आहेत.   

3/5

त्यातच आता सापडलेलं भुयार पाहता आता मुंबई जिल्हाधिराऱ्यांकडे (Mumbai Collector) यासंदर्भातील माहिती सोपवण्यात आली आहे.  

4/5

काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज परिसरातही असंच भुयार सापडलं होतं.   

5/5

मुंबईत (Mumbai) अशा प्रकारचं भुयार सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही.