PHOTOS : इस्रायलची हळवी बाजू; 'या' रहस्यमयी भिंतीपाशी येऊन का रडू लागतात ज्यू? कारण समोर...

Israel Western Wall: ही तर फक्त एक भिंत... असा विचार करण्यापूर्वी जाणून घ्या त्या भिंतीचं महत्त्वं आणि इतिहास.   

Oct 08, 2024, 10:55 AM IST

Israel Western Wall: इस्रायलचं सैन्य, ताकद आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा मोसाद यांची जगभरात बरीच चर्चा असते. पण, त्याव्यतिरिक्त इस्रायलचं एक असं रहस्य आहे, ज्याविषयी संपूर्ण जगात बरंच कुतूहल पाहायला मिळतं. 

 

1/7

सातत्यानं चर्चेत

israel why jews cry at Western Wall know history

Israel Western Wall: जगाच्या पाठीवर सातत्यानं चर्चेत असणाऱ्या देशांमध्ये येणारं एक नाव म्हणजे इस्रायल. जगभरात इस्रायलच्या सैन्याविषयी कमालीचं कुतूहल असून, या देशातील ज्यू समुदाय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांच्या योगदानासाठी ओळखला जातो. असं असलं तरीही हा समुदाय, प्रत्येक व्यक्ती इथं असणाऱ्या एका भिंतीपाशी येऊन रडू लागतात. असं का घडतं, या रहस्यमयी भिंतीमागे दडलंय काय? हा प्रश्न अनेकांनाच पडतो. 

2/7

वेलिंग वॉल

israel why jews cry at Western Wall know history

फक्त इस्रायल नव्हे, तर संपूर्ण जगातील ज्यू इथं असणाऱ्या वेस्टर्न वॉलपाशी येतात कारण हे त्यांच्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्रासमान आहे. 'वेलिंग वॉल' किंवा 'कोटेल' म्हणूनही या भिंतीला ओळखलं जातं. जेरुसलेम येथे जुन्या शहरामध्ये ही भिंत अतिशय भग्नावस्थेत उभी आहे. 

3/7

हमसून हमसून रडू लागतात

israel why jews cry at Western Wall know history

या वेलिंग वॉलपाशी येताच ज्यूंच्या डोळ्यांतून आसवं घरंगळतात आणि ते हमसून हमसून रडू लागतात. प्राचीन ज्यू मंदिराचा शेवटचा अवशेष म्हणून फक्त आणि फक्त ही भिंतच उभी असून, त्याच कारणानं भिंत पाहताच ज्यूंना भावना अनावर होतात.  

4/7

पवित्र तीर्थक्षेत्र

israel why jews cry at Western Wall know history

पहिलं शतक सुरू होण्यापूर्वी पॅलेस्टाईनवर रोमन साम्राज्याची सत्ता आली आणि त्याच काळात ज्यूंचं पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या सेकंड टेंपलला उध्वस्त करण्यात आलं. आजच्या घडीला त्याच मंदिराची अवघी एक भिंत शिल्लक आहे, जिथं येताच अनेकांना आपण आपली संस्कृती वाचवण्यात अपयशी ठरलो या भावनेनं अश्रू अनावर होतात.   

5/7

प्रार्थना

israel why jews cry at Western Wall know history

रोमन साम्राज्याच काळात ज्यूंना त्यांच्या मातृभूमीतून काढता पाय घेत युरोप आणि अमेरिकेसह इतर देशांमध्ये शरण घ्यावी लागली होती. त्याचवेळी ज्यू जेरुसलेमसाठी आसवं गाळत आणि इथं परत येण्याची शपथ घेत. याच पश्चिमी भिंतीला स्मरुन ते प्रार्थना करत आणि मायभूमीवर परतण्याची शपथ घेत. 

6/7

परमात्म्याशी संवाद

israel why jews cry at Western Wall know history

अशीही धारणा आहे की, ही भिंत ज्यूंना थेट परमात्म्याशी संवाद साधण्याची संधी देते. जगभरातील ज्यू त्यांच्या मनातील प्रार्थना घेऊन इथं येतात आणि आपल्या देवापुढं व्यक्त होतात, अनके चिठ्ठ्याही इथं सोडून जातात, धार्मिक ग्रंथपठण करतात.   

7/7

धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रम

israel why jews cry at Western Wall know history

अनेक धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमही या ठिकाणी पार पडतात. इतकंच नव्हे, तर जगभरातील नेतेमंडळीसुद्धा ज्यूंच्या या पवित्र तीर्थक्षेत्राला आवर्जून भेट देताना दिसतात. .