IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान

Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे.   

Sep 21, 2023, 13:35 PM IST

देशोदेशीच्या प्रवाशांना भारतामध्ये प्रवास करण्याची सुविधा पुरवण्यासोबतच भारतीय रेल्वे आणखी काही सुविधासुद्धा प्रवाशाना देत असते. त्याचाच एक भाग म्हणजे IRCTC चे टूर पॅकेज. 

1/7

ही संधी तुम्हालाही मिळणार

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

काश्मीर, राजस्थान, श्रद्धास्थळांनंतर आता आयआरसीटीसीकडून पर्यटनप्रेमींना सिक्कीम- गंगटोक भ्रमंतची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत ही संधी तुम्हालाही मिळणार आहे.   

2/7

बेस्ट डील

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

20 नोव्हेंबर 2023 पासून या प्रवासाची सुरुवात होणार असून, यामध्ये तुम्हाला 30500 रुपयांत बेस्ट डील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या कमाल बेताविषयी आणखी माहिती हवीये?   

3/7

'नॉर्थ सिक्कीम डिलाईट'

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

'नॉर्थ सिक्कीम डिलाईट' असं या सहलीचं नाव असून, 7 रात्री आणि 8 दिवसांसाठी तुम्ही या प्रवासावर जाणार आहात. जिथं आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये रेल्वे प्रवास, हॉटेलमध्येमध्ये राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च आणि प्रवासविमा समाविष्ट आहे.   

4/7

कुठेकुठे भेट देता येणार?

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

रेल्वे मार्गानं प्रवास करत या सहलीमध्ये तुम्हाला गंगटोक, सिक्कीम लाचेन, गुरुडोंगमार लेक, लाचूंग, युमतांग लेक अशा ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.   

5/7

राहण्याची ठिकाणं...

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

आयआरसीटीसीनं दिलेल्या माहितीनुसार गंगटोकमध्ये हॉटेल शिरगो (Hotel Shirgo/Similar), लाचेनमध्ये Summit Panghen Metok/Similar आणि लाचुंगमध्ये Hotel Le Coxy/Similar मध्ये तुम्हाला राहता येणार आहे.   

6/7

सहलीमध्ये कोणताही बदल झाल्यास...

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

आयआरसीटीसीच्या माहितीनुसार सहलीमध्ये कोणताही बदल झाल्यास, ती रद्द झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. शिवाय सहलीदरम्यान वरील कारणांमुळं आयत्या वेळी काही सुविधांसाठी जास्तीचा खर्च लागल्यास तो प्रवाशांनी करणं अपेक्षित असेल.   

7/7

प्रवास खर्च

irctc sikkim gangtok tour package details iternary latest update

सिक्कीम सफरीसाठी एका प्रवाशाला ₹ 41,800/- रुपये, दोन प्रवाशांसाठी ₹ 31,500/- रुपये, तिघांसाठी ₹ 30,500/- रुपये असा खर्च असेल. लहान मुल असल्यास (स्वतंत्र बेड), ₹ 28,200/- आणि बेड न घेतल्यास ₹ 25,300/- इतका प्रवास खर्च येणार आहे.