दक्षिण भारताचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; पाहा IRCTC चं Tour Package

IRCTC Tour Package : सर्वसामान्याच्या मिळकतीला केंद्रस्थानी ठेवत आयआरसीटीसीकडून त्यांच्या खिशाला परवडतील अशाच दराचे ट्रॅव्हल पॅकेज तयार केले जातात. आता असंच एक पॅकेज तुमची वाट पाहतंय.   

Aug 19, 2023, 08:31 AM IST

IRCTC Tour Package : दररोजची कामं, धकाधकीचं आयुष्य या साऱ्यातून वेळ काढत एखाद्या छानशा ठिकाणी वर्षातून किमान एकदातरी फिरायला जावं. खर्चाची काळजी करण्याची गरज नाही. कारण, भारतीय रेल्वे विभागानं याचीही काळजी घेतली आहे. 

1/8

DAKSHIN BHARAT YATRA

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

DAKSHIN BHARAT YATRA : आयआरसीटीसीकडून तुमच्या हिवाळी सुट्टीचा बेत आतापासून आखण्यात आला आहे. या दिवसांमध्ये उत्तर भारताला बगल देत यंदाच्या वर्षी तुम्ही दक्षिण भारत फिरून पाहा.   

2/8

IRCTC

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

दक्षिण भारतातील मन मोहणारं सौंदर्य, तेथील संस्कृती आणि तेथी खाद्यसंस्कृतीला जवळून पाहण्यासाठी IRCTC तुमच्यासाठी घेऊन आलंय 'दक्षिण भारत यात्रा'.

3/8

उर्जा देणारी सहल

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

दक्षिण भारतातील लोकप्रिय स्थळं त्यातही आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या मंदिरांची सफर तुम्हाला या सहलीतून घडणार आहे. एक सकारात्मकता आणि कमालीची उर्जा देणारी ही सहल तुम्हाला असंख्य नवे अनुभव देणारी ठरेल.   

4/8

प्रवासाची तारीख

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

11 रात्री आणि 12 दिवसांसाठीच्या या सहलीची सुरुवात 11 डिसेंबर 2023 ला होणार असून, 22 डिसेंबर 2023 ला ही सहल पूर्ण होईल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेननं या सहलीचा प्रवास पूर्ण होईल. 

5/8

कोणत्या स्थानकांवर ट्रेन पकडता येणार?

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

मालदा शहर, न्यू फरक्का, पाकुर, रामपुरहाट, दुमका, हंन्सदीहा, भागलपूर, सुलतानगंज, जमालपूर, किऊल, जामुई, झाझा, जसिदीह, चित्तरंजन, कुल्ती, धनबााद, बोकारो, रांची, रौरकेला, संबलपूर अशा स्थानकांवरून तुम्ही रेल्वेत बसू / उतरू शकता. 

6/8

कोणकोणत्या ठिकाणी जाता येणार?

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

आयआरसीटीसीच्या या सहलीमध्ये तिरुपती बालाजी, मिनाक्षी अमन मंदिर, रामनाथस्वानी मंदिर, कन्याकुमारी मंदिर, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर इथं भेट देण्याची संधी तुम्हाला मिळेल. 

7/8

खर्च किती?

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

या टूर पॅकेजच्या खर्चाचं सांगावं तर, इकोनॉमी क्लाससाठी माणसी 22750 रुपये, स्टँडर्ड क्लाससाठी 36100 आणि कम्फर्ट क्लाससाठी 39500 रुपये इतका खर्च येईल. 

8/8

प्रवास खर्चात काय काय मिळणार?

irctc launched dakshin bharat yatra by bharat gaurav tourist train see package details

प्रत्येक क्लासनुसार या प्रवासात काही सोयीसुविधा समाविष्ट असतील. यामध्ये सकाळचा चहानाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश आहे. पर्यटकांचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, गाईड, सुरक्षा या साऱ्याचीही नोंद आहे.