1/7
पठान बंधू
भारतीय क्रिकेटमध्ये यूसुफ पठान (Yusuf Pathan) आणि इरफान पठान (Irfan Pathan) यांनी अनेक वर्ष आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)ने 2008 मध्ये पहिला खिताब जिंकला होता. ज्यात यूसुफ पठानचं महत्त्वाचं योगदान होतं. फायनल मॅचमध्ये 22 रन देत त्याने 3 विकेट घेतले होते. तसेच 39 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली होती. आईपीएल-2009 मध्ये यूसुफने 37 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. आयपीएलमधील ते सर्वात जलद शतक होतं. यूसुफने आयपीएलमध्ये 16 `मॅन ऑफ द मॅच` अवॉर्ड जिंकले आहेत. इरफानने देखील भारतीय क्रिकेटला मोठं योगदान दिलं. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये 2 वेळा तो `मॅन ऑफ द मॅच` ठरला. इरफानने बॉल आणि बॅट दोन्हीने चांगली कामगिरी केली. यूसुफने 174 सामन्यात 3204 रन केले. ज्यामध्ये 158 सिक्स आहेत. तर 42 विकेटही घेतल्या आहेत. इरफानने 103 सामन्यात 1124 रन आणि 80 विकेट घेत शानदार ऑलराउंड कामगिरी केली आहे. (फोटो- Twitter/@iamyusufpathan)
2/7
चाहर बंधू
यूएईमध्ये होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या सीजनमध्ये हे दोघे भाऊ वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून दीपक चाहर (Deepak Chahar), तर मुंबई इंडियंसकडून राहुल चाहर (Rahul Chahar) खेळताना दिसणार आहे. दोघे भाऊ चांगली कामगिरी करत आहेत. चुलत भाऊ असले तरी दोघे ही सख्ख्या भावाप्रमाणे आहेत. दीपकने 2012 मध्ये डेब्यू केले होते. त्याने राजस्थान रॉयल्सकडून पहिला सीजन खेळला होता. पण त्याला टीममध्ये अधिक संधी मिळाली नव्हती. 2018 मध्ये दीपकने सीएसकेकडून खेळताना 12 सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल-2019 मध्ये दीपकने 17 सामन्यात 22 विकेट घेतले होते. राहुलने आयपीएल-2017 मध्ये मुंबईकडून खेळण्यास सुरुवात केली. युवा लेग स्पिनरला फक्त ३ सामन्यात संधी मिळाली. आयपीएल-2018 मध्ये त्याला संधी नाही मिळाली. पण आयपीएल-2019 मध्ये त्याने 13 सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या. (फोटो- Twitter/@rdchahar1)
3/7
पांड्या बंधू
मुंबई इंडियंस टीमकडून खेळणारे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) एक विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचा मोठा भाऊ क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) ने देखील आपल्या कामगिरीने त्याचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. दोघेही ऑलराऊंडर आहेत. आईपीएल-2015 मध्ये डेब्यू करणारा हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या बॉलवर सिक्स मारला होता. त्याने चेन्नई सुपरकिंग्सच्या विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 30 रन केले होते. 8 बॉलमध्ये 21 रन करणाऱ्या हार्दिकने त्याची जागा पक्की केली होती, आयपीएल-2019 मध्ये 402 रन करणारा आणि 14 विकेट घेणारा हार्दिक याने 66 सामन्यांमध्ये 154.78 च्या स्ट्राईक रेटने 1068 रन केले आहेत. 42 विकेट देखील त्याने घेतले आहेत. क्रुणालने 2016 पासून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली. आयपीएल-2017 च्या फायनल मॅचमध्ये मुंबईला चॅम्पियन बनवण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं. क्रुणालने 55 सामन्यात 146.06 स्ट्राईक रेटने 891 रन करत 40 विकेट घेतल्या आहेत. (फोटो-Twitter/@krunalpandya24)
4/7
मार्श बंधू
ऑस्ट्रेलियाचे मार्श बंधूंनी देखील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. शॉन मार्श (Shaun Marsh) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) वेगवेगळ्या संघाकडून खेळत होते. त्यांचे वडील ज्यौफ मार्श (Geoff Marsh) कोच म्हणून लीगचा भाग राहिले आहेत. शॉन मार्शने तर आयपीएलमध्ये खूप नाव कमवलं. 2008 मध्ये त्याने सर्वाधिक रन केले होते आणि ऑरेंज कॅप मिळवली होती. शॉनने किंग्स इलेवन पंजाबकडून खेळतान 616 रन केले होते. त्याने त्यानंतर 9 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळवले आहेत. मिचेल एक चांगला ऑलराउंडर होता. आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण आयपीएल पेक्षा इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये त्याला अधिक आवड होती. शॉन मार्शने 71 सामन्यात 20 फिफ्टी आणि 1 शतक ठोकलं आहे. त्याने 2477 रन केले आहेत. तर 20 सामन्यात 226 रन करत 20 विकेट देखील घेतल्या आहेत.
5/7
हसी बंधू
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियातील माईक हसी (Mike Hussey) ज्यांना `मिस्टर क्रिकेट` म्हटलं जातं. तर भाऊ डेविड हसी (David Hussey) ने देखील आपली छाप सोडली आहे. माईक हसीने मुंबई इंडियंसकडून आयपीएलमध्ये डेब्यू केलं. पण चेन्नई सुपरकिंग्स सोबत खेळताना त्यांने अधिक चांगली कामगिरी केली. चेन्नईसाठी माईकने नॉटआउट 116 रनची खेळी केली होती. सध्या चेन्नईचा सहायक कोच असलेल्या माईक हसीने 59 आयपीएल मध्ये 38.76 च्या रनरेटने आणि 122.64 च्या स्ट्राइक रेटने 1977 रन केले आहेत. माईकच्या उलट डेविडने कोलकाता नाईट रायडर्सकडून सुरुवात केली. नंतर किंग्स इलेवन पंजाब आणि शेवटी चेन्नई सुपरकिंग्सकडून त्याने सामने खेळले. आयपीएल-2014 मध्ये ड्वेन ब्रावो दुखापतीमुळे बाहेर झाला आणि ऑलराउंडर डेविडला फायनल इलेवनमध्ये संधी मिळाळी. डेविडने 64 सामन्यात 1322 रन केले. तसेच आयपीएलमध्ये त्याने 8 विकेट देखील घेतले आहेत.
6/7
मोर्कल बंधू
दक्षिण आफ्रिकेचे मोर्कल बंधूनी देखील आयपीएलमध्ये छाप सोडली आहे. एल्बी मोर्कल (Elbie Morkal) ने ऑलराउंडर म्हणून चेन्नई सुपर किंग्स कडून तर गोलंदाज मोर्ने मोर्कल (Morne Morkal) ने दिल्ली, कोलकाता आणि राजस्थानकडून अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एल्बीने 91 सामन्यांमध्ये 974 रन करत 85 विकेट घेतल्या आहेत. मोर्नेने 70 सामन्यात 77 विकेट घेतले आहेत.
7/7