IPL 2025 : फ्रँचायझींना धोका, आता सुट्टी नाही! 'या' खेळाडूंवर होणार कडक कारवाई

BCCI Action On foreign players : आयपीएल संघांनी बीसीसीआयला हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Saurabh Talekar | Jul 31, 2024, 20:23 PM IST
1/5

आयपीएल ऑक्शन

आयपीएल ऑक्शनमध्ये बाजी मारलेल्या फ्रँचायझींना सिझनमध्ये यश मिळत नाही. त्याला कारण प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती..!

2/5

राष्ट्रीय कर्तृत्व

अनेक परदेशी खेळाडू आयपीएलच्या तोंडावर फ्रँचायझीकडून भलीमोठी रक्कम तर घेतात आणि राष्ट्रीय कर्तृत्वाचं नाव सांगून खेळत नाहीत.

3/5

आयपीएल फ्रँचायझी

अशा खेळाडूंवर कारवाई व्हावी, असं आयपीएल फ्रँचायझींचं म्हणणं आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.

4/5

परदेशी खेळाडूंवर कारवाई

हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई व्हावीस, अशी विनंती आयपीएल संघांनी बीसीसीआयला केली आहे.

5/5

या खेळाडूंची पंचायत

दरम्यान, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, ॲडम झाम्पा, ॲलेक्स हेल्स, जेसन रॉय या खेळाडूंची पंचायत होण्याची शक्यता आहे.