IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स देणार ऋषभ पंतला डच्चू? नवा कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं चर्चेत

New captain of Delhi Capitals : आगमी आयपीएलमध्ये (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण असेल? असा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

Saurabh Talekar | Jul 18, 2024, 17:32 PM IST
1/5

मेगालिलाव

आगामी आयपीएलसाठी मेगालिलाव पार पडणार आहे. यामध्ये अनेक खेळाडूंची उलटापालट होणार आहे. त्याचबरोबर अनेक संघांचे कॅप्टन देखील बदलतील.

2/5

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएल जिंकला आली नाही. त्यामुळे आता मॅनेजमेंट मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अशातच ऋषभला नारळ दिला जाऊ शकतो.

3/5

रोहित शर्मा

ऋषभ पंत दिल्ली संघात नसेल तर संघाची जबाबदारी कोणावर असेल? असा सवाल विचारला जात आहे. त्यात पहिलं नाव येतंय, रोहित शर्माचं... होय, रोहित दिल्लीची कॅप्टन्सी करताना दिसू शकतो.

4/5

केएल राहुल

लखनऊ सुपर जाएन्ट्स आता केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर खुश नाहीये. त्यामुळे ऑक्शनमध्ये केएल राहुलला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशातच आता केएलची दिल्लीत एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

5/5

अक्षर पटेल

दिल्ली कॅप्टिल्ससाठी अनेक सामन्यात तारणहार ठरणारा अक्षर पटेल येत्या काळात संघाचं नेतृत्व करू शकतो. जर ऑक्शनमध्ये चांगला खेळाडू मिळाला नाही तर दिल्ली अक्षरवर जबाबदारी सोपवू शकते.