IPL 2024 : 'हे' 5 फलंदाज असणार ऑरेंज कॅपच्या शर्यतीत, कोणाची बॅट तळपणार?

IPL 2024 चा महासंग्राम हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तरी बहुतेक खेळाडूंनी आप-आपल्या संघासोबत प्रॅक्टिस करायला सुद्धा सुरूवात केलेली आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडू हा आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांना आपल्या देशाच्या टीममध्ये स्थान मिळवायचे असते. अशात बघण्यायोग्य गोष्ट असेल की आयपीएल 2024 मध्ये भारतीय फलंदाज चमकदार कामगिरी करू शकणार की नाही, आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीम्सच्या चाहत्यांचे मनोरंजन करू शकणार की नाही?

Mar 15, 2024, 17:23 PM IST

IPL 2024 : IPL 2024 चा महासंग्राम हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तरी बहुतेक खेळाडूंनी आप-आपल्या संघासोबत प्रॅक्टिस करायला सुद्धा सुरूवात केलेली आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडू हा आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांना आपल्या देशाच्या टीममध्ये स्थान मिळवायचे असते. अशात बघण्यायोग्य गोष्ट असेल की आयपीएल 2024 मध्ये भारतीय फलंदाज चमकदार कामगिरी करू शकणार की नाही, आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीम्सच्या चाहत्यांचे मनोरंजन करू शकणार की नाही?

1/7

22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी ( IPL 2024 ) टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. या सिझनमध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यामध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) गेल्या सिझनमधील विजेती आहे. 17 व्या सिझनला आता अवघे काही दिवस उरले असून साऱ्या क्रिकेटफॅन्समध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

2/7

क्रिकेट चाहत्यांना नेहमीच आयपीएलमध्ये मनोरंजन हवे असते. यामध्ये फलंदाज हे नेहमी महत्वाची भूमिका बजावत असतात, तर यावर्षी कोणते फलंदाज धडाकेबाज प्रदर्शन करून आपल्या टीम्सच्या चाहत्यांना मनोरंजीत करून, यासोबतच ऑरेज कॅप जिंकू शकतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.   

3/7

1. विराट कोहली -

आयपीएलच्या इतिहासात जेव्हापण फलंदाजांची गोष्ट होते तेव्हा विराट कोहलीचे नाव घेणे गरजेचे असते. कारण, कोहली हा आयपीएल इतिहासातला सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या करिअरमध्ये एकूण 7263 रन्स केलेले आहेत. तर आयपीएल 2023 मध्ये विराटने 53.25 च्या सरासरीने 14 मॅचमध्ये एकूण 639  रन्स केले होते. ज्यामध्ये विराटने 2 शतक आणि 6 अर्धशतक सूद्धा ठोकले होते. या वर्षी विराट आपल्या बॅटिंगने RCB च्या फॅन्सला प्रभावित करू शकणार का, हे बघण्यायोग्य होणार आहे.  

4/7

2. शुभमन गिल

भारतीय क्रिकेटचा युवा चेहरा मानला जाणारा शुभमन गिल हा IPL 2024 मध्ये आपल्या बॅटने रन्स ठोकण्यासाठी उत्सुक असणार आहे. IPL 2023 मध्ये शुभमन गिलने ऑरेंज कॅप जिंकून गुजरात टायटन्सला फायनलपर्यंत पोहोचवले होते.  मागील वर्षी शुभमनने 17 मॅचेसमध्ये 59.33 सरासरीने एकूण 890 रन्स बनवून साऱ्या गोलंदाजांचा धुवा उडवला होता. या शानदार सिजनमध्ये शुभमनच्या बॅटने एकूण 3 शतक आणि 4 अर्धशतक सामिल होते.

5/7

3. फाफ डु प्लेसिस

रॉयल चैंलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस हा नेहमीच उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत समाविष्ट असतो. फाफ डु प्लेसिस हा एकमेव विदेशी खेळाडूंपैकी आहे जो आयपीएलच्या प्रत्येक सिजनमध्ये खूप चांगली कामगिरी करत असतो. डु प्लेसिसने IPL 2023 मध्ये एकूण 14 मॅचेस खेळल्या होत्या आणि त्यामध्ये त्याने 56.15 च्या सरासरीने एकूण 730 रन्स बनवले होते. यावर्षीच्या आयपीएलमध्ये फाफ डु प्लेसिस हा ऑरेंज कॅपचा एक दमदार मानकरी ठरू शकतो.  

6/7

4. सूर्यकुमार यादव

भारतीय क्रिकेटचा युवा चेहरा मानला जाणारा शुभमन गिल हा IPL 2024 मध्ये आपल्या बॅटने रन्स ठोकण्यासाठी उत्सुक असणार आहे. IPL 2023 मध्ये शुभमन गिलने ऑरेंज कॅप जिंकून गुजरात टायटन्सला फायनलपर्यंत पोहोचवले होते.  मागील वर्षी शुभमनने 17 मॅचेसमध्ये 59.33 सरासरीने एकूण 890 रन्स बनवून साऱ्या गोलंदाजांचा धुवा उडवला होता. या शानदार सिजनमध्ये शुभमनच्या बॅटने एकूण 3 शतक आणि 4 अर्धशतक सामिल होते.  

7/7

5. यशस्वी जयस्वाल