आयपीएलमध्ये मालामाल होणार, 'या' 4 खेळाडूंवर करोडोची बोली लागणार

IPL 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते आयपीएलच्या नव्या हंगामाकडे. आयपीएल 2024साठी 19 डिसेंबरला दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. विश्वचषकात हिट ठरलेल्या काही खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 

| Dec 05, 2023, 20:26 PM IST
1/7

दुबईत खेळाडूंचा लिलाव

भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएल 2024 साठी 19 डिसेंबरला दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यासाठी तब्बल 1166 खेळाडूंनी आपलं नाव रजिस्टर केलं आहे.   

2/7

लिलावाआधी मोठी घडामोड

लिलावपूर्वीच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालाय. तर शुभमन गिलला गुजरातने नवा कर्णधार घोषित केलं आहे. 

3/7

दुबईत मिनी ऑक्शन

लिलावपूर्वीच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालाय. तर शुभमन गिलला गुजरातने नवा कर्णधार घोषित केलं आहे. 

4/7

ट्रेविस हेड

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयाचा हिरो ठरलेल्या ट्रेव्हिस हेडवर आयपीएलमध्ये सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हेडने 137 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर आयपीएल लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.

5/7

रचिन रवींद्र

न्यूझीलंडचा डावखुरा युवा गोलंदाज रचिन रविंद्रने यंदाच्या विश्वचषकात सर्वांचं लक्ष वेधून घएतलं. 24 वर्षांच्या या खेळाडूने विश्वचषक 2023 स्पर्धेत 578 धावा केल्या. फलंदाजीबरोबरच रचिन गोलंदाजीतही माहिर आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये रचिनला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचाईजी उत्सुक असतील. 

6/7

गेराल्ड कोएट्जी

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ज कोएटजीने विश्वचषक 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय. त्याने तब्बल विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये कोएटजीने दमदार कामगिरी केली. विश्वचषकातील हीच कामगिरी आयपीएलमध्ये त्याला करोडती बनवू शकते. 

7/7

डेरिल मिचेल

न्यूझीलंडचा आणखी एक आक्रमक फलंदाज म्हणजे डेरिल मिचेल. मिचेलने आपल्या आक्रमक फलंदाजीने विश्वचषकात भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये अनेक फ्रांचाईजचं लक्ष त्याच्यावर असेल. कठिण परिस्थितीत खेळपट्टीवर उभं राहात संघाला विजय मिळवून देण्यासाठी मिचेल ओळखला जातो.