IPL 2024 : दिल्लीविरुद्ध मुंबईने रचली रेकॉर्ड्सची गाथा, पाहा कोणते रेकॉर्ड रचले

आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांच्या फडशा पाडत 20 ओव्हरमध्ये तब्बल 234 धावांचा डोंगर दिल्लीसमोर ऊभा केला आणि प्रत्युत्तरात दिल्ली या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली. पण जिंकण्यासोबतच मुंबई इंडियन्सने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे. 

Apr 08, 2024, 20:10 PM IST
1/7

मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरीत दिल्ली कॅपिटल्ससमोर तब्बल 235 धावांचे टार्गेट दिले होते. यात मुंबईकडून रोहित शर्माने 49 , इशान किशनने 42, कॅप्टन हार्दिक पांड्याने 39, टीम डेविडने 45, तर रोमारिओ शेफर्डने ताबडतोब 39 धावांचे योगदान दिले होते.

2/7

दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून फक्त पृथ्वी शॉ आणि ट्रिस्टन स्टब्स हे दोघेच चांगली फलंदाजी करू शकले आणि शेवटी अभिषेक पोरेलच्या फटकेबाजीमुळे दिल्ली 205 धावांपर्यंतच भिडली आणि मुंबईच्या वानखेडे मैदानावर 29 धावांनी मुंबई इंडियन्सविरूद्ध आयपीए 2024 चा चौथा पराभव पत्कारला.  

3/7

या सामन्यात मुंबईकडून रोहित-इशानच्या जोडीनं टीमला चांगली सुरूवात दिली होती. पण डेथ ओव्हर्समध्ये तगड्या डेविड आणि शेपर्डच्या तूफानी फलंदाजीमुळे MI ने 5 ओव्हर्समध्ये तब्बल 96 धावा ठोकल्या होत्या.

4/7

रोमारिओ शेपर्ड आणि टीम डेविडच्या दमदार भागीदारीमुळे मुंबईने 16 व्या ओव्हरीत 12, 17 व्या ओव्हरीत 17, 18 व्या ओव्हरीत 16, 19 व्या ओव्हरीत 19 , तर 20 व्या ओव्हरीत चक्क 32 धावा काढल्या होत्या. तर डेथ ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याच्या लिस्टमध्ये 96 धावा बनवण्याचा रेकॉर्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरूद्ध डेथ ओव्हर्समध्ये तब्बल 112 धावा झोडल्या होत्या.

5/7

आयपीएलच्या 20 व्या मॅचनंतर मुंबईने आयपीएलच्या एका टीमविरूद्ध सर्वात जास्त वेळेस 200 धावा बनवण्याचा रेकॉर्डसुद्धा आपल्या नावावर केला आहे.  या रेकॉर्डसोबत मुंबईने आरसीबीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आरसीबीने पंजाब किंग्सविरूद्ध सहा वेळेस 200 हून जास्त धावा बनवल्या, तर आता मुंबईनेसुद्धा दिल्लीविरूद्ध सहा वेळेस 200 हून अधिक धावा बनवल्या आहेत. 

6/7

मुंबईच्या रोमारिओ शेपर्डने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नॉर्खियाविरूद्ध तब्बल 32 धावा ठोकल्या आहेत. या कारनाम्यामुळे शेपर्ड 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याच्या मामल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी आयपीएल 2023 मध्ये रविंद्र जडेजाने आरसीबीविरूद्ध हर्षल पटेलच्या 20 व्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकल्या होत्या.   

7/7

मुंबई इंडियन्सने दिल्लीविरूद्ध तीसरा सर्वात मोठा स्कोर बनवला, याआधी आयपीएल 2024 मध्येच सनरायझर्स हैदराबादविरूद्ध मुंबईने 246 चा स्कोर उभा केला होता, 2021 मध्ये हैदराबादविरूद्धच मुंबईच्या पलटणने 235 धावा ठोकल्या होत्या.