IPL ट्रॉफी उचलणाऱ्या टीमला किती मिळणार प्राईज मनी? कोणता संघ होणार मालामाल?

IPL 2024 Prize Money : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH IPL 2024 final) यांच्यात खेळवला जाणार आहे.   

| May 26, 2024, 18:46 PM IST
1/7

कोलकाता vs हैदराबाद

कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या कोण बाजी मारणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र, फायनल कोणीही जिंको दोन्ही संघ मालामाल होणार आहेत.

2/7

श्रीमंत क्रिकेट लीग

इंडियन प्रिमियर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटर्सला देखील भरघोस पैसे मिळतात.

3/7

20 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील अंतिम सामना जो संघ जिंकेल त्याला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

4/7

12.5 कोटी

त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 12.5 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. क्रिकेट लीगमधील विजेत्या संघासाठी सर्वाधिक रक्कम आहे.

5/7

7 कोटी

आयपीएल 2024 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी 7 कोटी रुपये दिले जातील.

6/7

राजस्थान - बंगळुरू

त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांना प्रत्येकी 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

7/7

केकेआर की हैदराबाद?

दरम्यान, आता 20 कोटी कोणाच्या पदरी पडणार? केकेआर की हैदराबाद? असा सवाल आता विचारला जात आहे.