IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

| Apr 24, 2024, 16:29 PM IST

IPL 2024 : क्रिकेटमधून सर्वाधिक पैसा कमावणारे खेळाडू कोण? याचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. तुम्हाला रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांचं नाव आठवत असेल. पण हा खेळाडू सर्वाधिक पैसे कमवतो.

1/9

केएल राहुल

लखनऊ सुपर जायएन्ट्सचा कॅप्टन केएल राहुल क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे कमवतो. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी आणि आयपीएलमधून मिळणारे 17 कोटी राहुलला मिळतात.

2/9

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयकडून 7 कोटी वर्षाला घेतो. तर त्या आयपीएलमधून 16 कोटी वर्षाला मिळतात.

3/9

ऋषभ पंत

या यादीत तिसऱ्या स्थानी येतो ऋषभ पंत... ऋषभ देखील रोहितप्रमाणे बीसीसीआयकडून 7 कोटी आणि आयपीलएमधून 16 कोटी कमावतो.

4/9

रविंद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार रविंद्र जडेजाला आयपीएलमधून 16 कोटी मिळतात. तर बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी जड्डूला मिळतात.  

5/9

विराट कोहली

विराट कोहलीचा देखील या यादीत समावेश आहे. विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानी येतो. विराट बीसीसीआयचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15.25 कोटी कमावतो.

6/9

हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15 कोटी घेतो.

7/9

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह देखील या यादीत आहे. बुमराहला मुंबईकडून खेळण्यासाठी 12 कोटी मिळतात. तर बीसीसीआय टीम इंडियाकडून खेळण्यासाठी त्याला 7 कोटी मोजते.

8/9

शुभमन गिल

शुभमन गिल याला बीसीसीआयकडून खेळण्यासाठी 5 कोटी दिले जातात. तर आयपीएलमधून त्याला 8 कोटी मिळतात.

9/9

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव याला देखील बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमधून 5 कोटी दिले जातात. तर आयपीएलमधून सूर्याला 8 कोटी मिळतात.