IPL 2023 : सूर्यकुमार की राशिद, मुंबई वि. गुजरात सामन्यातील खरा सामनावीर कोण?

IPL 2023 MI vs GT : आयपीएलमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्सदरम्यान (Gujrat Titans) सामना रंगला. या सामन्या मुंबई इंडियन्सने गुजरातवर मात करत पराभवाचा बदला घेतला. पण हा सामना गाजला तो मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि गुजरात टायटन्सच्या (Gujrat Titans) राशिद खान यांच्या तुफान फटकेबाजीने.

| May 13, 2023, 09:41 AM IST
1/6

त्याआधी राशिद खानने गोलंदाजीतही कमाल केली होती. मुंबईचे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांना झोडपत असताना एकट्या राशिदने मुंबईला दणका दिला. राशिदने चार षटकात अवघ्या 30 धावादेत चार विकेट घेतल्या. यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासह ईशान किशन, नेहाल वढेरा टीम डेव्हिडला त्याने तंबूत पाठवलं.

2/6

मुंबईच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूर्यकुमार तळपला पण राशिद खान चमकला अशी प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांनी दिलीय. राशिद खानच सामनावीर पुरस्काराचा खरा हकदार आहे अशा पोस्ट काही जणांनी टाकल्या आहेत. 

3/6

मुंबईने दिलेल्या विजयाचं लक्ष समोर ठेवून खेळणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. 103 धावांवर 8 विकेट अशी अवस्था असताना मैदानावर उतलेल्या राशीदने सामन्याचं चित्रच पाटलंय.  राशिदने मुंबईच्या मोठ्या विजयाच्या मनसुब्यावर अक्षरश : पाणी फेरलं. राशिदने अवघ्या 32 चेंडूक 79 धावांची खेळी केली. यात त्याने तब्बल 10 षटकार लगावले. राशिदच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 191 धावा केल्या.

4/6

मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग करत 218 धावा केल्या. यात एकट्या सूर्यकुमारचा वाटा होता नाबाद 103 धावांचा. मुंबईच्या वानखेडे मैदानावर मि.360 सूर्याने वादळी खेळी केली. गुजरातच्या गोलंदाजांची सूर्यने अक्षरश: पिसं काढली. सूर्याने 6 षटकार आणि 11 चौकारांची आतषाबाजी केली. याच खेळीमुळे सूर्या सामनावीराचा मानकरी ठरला.

5/6

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स सामन्यात विजय-पराभवापेक्षा जास्त चर्चा झाली ती मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि गुजरातच्या राशिद खानच्या तुफान फटेकबाजीची. वानखेडे मैदानावर षटकार चौकारांची आतषबाजी पाहिली मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर खरा सामनावीर कोण यावरुन दोन गट पडले आहेत. 

6/6

मुंबईच्या वानखेडे मैदानावर शुक्रवारी हायव्होल्टाज सामना रंगला. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सने पॉईंटटेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुजरात टायटन्स पराभवानंतरही पहिल्या स्थानावर कायम आहे.