IPL 2023: परदेशी खेळाडूंवर कोटी रूपये खर्च करणं फ्रेचायझींना पडलं भारी, पहिल्याच सामन्यात खेळाडू फेल

आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंवर बोली लावली. यावेळी फ्रँचायझींनी या खेळाडूंवर पैशांची बरसता केली. यानंतर सिझनला सुरुवात झाली मात्र पैशांचा वर्षाव करण्यात आलेले काही खेळाडू चांगलेच फ्लॉप गेले आहेत.

Apr 05, 2023, 19:46 PM IST

रदेशी खेळाडूंवर कोटी रूपये खर्च करणं फ्रेचायझींना पडलं भारी पडलं आहे. यामध्ये काही खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल गेलेत.

1/5

चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या टीम्सने खेळाडूंसाठी चांगले पैसे मोजले. मात्र खेळाडूंनी पहिल्या सामन्यात टीमची निराशा केली.

2/5

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनसाठी मुंबईने 17.5 कोटी खर्च केले, मात्र पहिल्याच सामन्यात ग्रीन फेल झाला.

3/5

सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला 13.25 कोटींना आपल्या ताफ्यात घेतलं होतं, मात्र पहिल्याच सामन्यात त्याच्या पदरी अपयश आलं.

4/5

धोनीच्या चेन्नईने बेन स्टोक्सला विकत घेतलं. इंग्लंडच्या या खेळाडूसाठी 16.25 कोटी खर्च केले गेले. मात्र पहिल्या सामन्यात बेनची बॅट चालली नाही. 

5/5

सॅम करन हा आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू असून पंजाब किंग्सने 18.5 कोटी रूपये किंमत मोजली होती. मात्र करनलाही पहिल्या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही.