पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका या 6 गोष्टी; Romance वर फिरेल पाणी

Foods Avoid Before Sex: आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी काय करावं काय नाही यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ले देतात. यामध्ये इंटिमेट होण्यापूर्वी खालेल्या पदार्थांचाही मोठा परिणाम होतो. त्यामुळेच इंटिमेट होण्याआधी कोणत्या गोष्टी खाऊ नये हे ही फार महत्त्वाचं असतं. अशाच काही पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

Apr 06, 2023, 15:30 PM IST
1/7

Food To Avoid Before Getting Intimate

इंटीमेट होण्याआधी सामान्यपणे भरपूर जेवण करु नये असं सांगितलं जातं. तसेच फार चमचमीत आणि मसालेदार खाणंही टाळलं पाहिजे. अशा जेवणामुळे पोटात जळजळ किंवा अपचनासंदर्भातील समस्या होऊ शकतात. 

2/7

अल्कोहोल

अल्कोहोल

अल्कोहोल -  इंटीमेट होण्याआधी काहीजणांना मद्यपान करण्याची सवय असते. मात्र हे नातेसंबंधांच्या दृष्टीने योग्य नाही. एखादा ग्लास वाईन किंवा कॉकटेल वातावरण निर्मिती आणि आराम मिळावा म्हणून सेवन करता येईल. मात्र अती मद्यपान केल्यास भान हरपण्याबरोबर शारीरिक क्षमतांवरही मर्यादा आणतं.

3/7

कॅफीन

कॅफीन

कॅफीन - सामान्यपण कॉफीमध्ये आढळून येणारं कॅफीन हे रसायन हृदयाची गती वाढते. तसेच यामुळे चीडचीडही वाढण्याची शक्यता असते. कॅफीनमुळे व्यक्ती बऱ्याच गोष्टींबद्दल विचार करुन तो त्या गोष्टींची चिंता करु लागतो. रोमॅन्टीक होण्याच्या उद्देशाने हे वागणं बरोबर ठरणार नाही म्हणूनच कॅफीन टाळावं.

4/7

चटपटीत खाणं

चटपटीत खाणं

चटपटीत खाणं - जास्त मसालेदार जेवण केल्यास नाराज होणे, शरीरामधील अॅसिडीटीची लेव्हल वाढणे आणि अन्य पचनासंदर्भातील समस्या निर्माण होतात. यामुळे एखादी रोमॅन्टीक डेट खराब होऊ शकते.

5/7

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांदा - हे उग्र पदार्थ आहेत. या पदार्थांच्या सेवनानंतर त्यांचा वास बराच काळ तोंडामध्ये आणि श्वासात राहतो. अशा गोष्टींसहीत जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवणं शक्य नसतं. हे दोघांसाठीही हानीकारक ठरु शकते.

6/7

दुग्धजन्य पदार्थ

Food To Avoid Before Getting Intimate

दुग्धजन्य पदार्थ - दुग्धजन्य पदार्थांमुळे सूज येण्याबरोबर गॅसची समस्याही निर्माण होऊ शकते. तसेच श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण करण्यासाठीही हे पदार्थ कारणीभूत ठरु शकतात.

7/7

शेंगा - शेंगा आणि बीन्स

Beans

शेंगा - शेंगा आणि बीन्ससारख्या भाजांमुळे पचनासंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. या भाज्यांमुळे पोटांसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकते.