कार अपघातात दोन्ही पाय फ्रॅक्चर, डॉक्टर म्हणाले होते 'क्रिकेट सोडून दे'; पण आज IPL गाजवतोय

IPL 2023: वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस (Nicholas Pooran) पूरन सध्या आयपीएलमध्ये (IPL) जबरदस्त कामगिरी करत आहे. कोलकाताविरोधात झालेल्या सामन्यात त्याने 15 चेंडूत शतक ठोकलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे, निकोलस पूरनचा एकदा अपघात झाला होता. या अपघातात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. यानंतर 18 महिने तो क्रिकेटपासून दूर होता. यावेळी त्याची प्रेयसी नेहमी त्याच्या पाठीशी होती.   

Apr 15, 2023, 15:23 PM IST
1/6

वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस (Nicholas Pooran) पूरन आयपीएलमध्ये लखनऊ संघाकडून खेळत आहे. नुकतंच बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात त्याने 19 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. मैदानावर तुफान खेळी करणाऱ्या या खेळाडूला एकदा डॉक्टरांनी क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला होता. पण यावेळी त्याला त्याच्या प्रेयसीने मात्र पाठिंबा दिला होता.   

2/6

2015 साली निकोलस 19 वर्षांचा असताना अपघात झाला होता. या अपघातात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला क्रिकेट सोडून देण्यास सांगितलं होतं.   

3/6

यानंतर 18 महिने निकोलस क्रिकेटपासून दूर होता. त्यावेळी निकोलस पूरन एलिसासह नात्यात होता.   

4/6

निकोलसने 2020 मध्ये एलिसाशी लग्न केलं. 2 वर्षांपूर्वी निकोलसने सोशल मीडियावर पत्नीबाबत एक पोस्ट शेअर केली होती.   

5/6

या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, "या जन्मात येशूने मला खूप काही दिलं आहे. पण तुझं आयुष्यात येणं यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही". यानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या.   

6/6

निकोलस आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने 4 सामन्यात 47 च्या सरासरीने 141 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 220 चा आहे. नुकतंच बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात त्याने 15 चेंडूत शतक ठोकत तुफानी खेळी केली होती.