Photos: 'मी कॅप्टन आहे, मला थोडावेळ कॅप्टन्सी करु दे!' मॅचदरम्यान ऋतुराजची धोनीला विनंती?

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos: चेन्नईच्या मैदानात आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाने पाहुण्या बंगळुरुच्या संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र सामना सुरु झाल्यापासून अगदी संपेपर्यंत मैदानात एकाच व्यक्तीची चर्चा होती. ती म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्यातही धोनीच संघाचा कर्णधार आहे की काय अशी शंका उपस्थित व्हावी असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...

Swapnil Ghangale | Mar 23, 2024, 08:55 AM IST
1/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी पहिल्यांदाच आयपीएल 2024 मध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदम्बर स्टेडियममध्ये सामना खेळता दिसून आला.  

2/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

चेन्नईच्या होम ग्राऊण्डवर धोनीची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. याचाच प्रत्यय शुक्रवारी चेन्नईमध्ये पुन्हा एकदा आला.  

3/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

विशेष म्हणजे कर्णधार पद सोडल्यानंतरही धोनी फिल्डींग सेट करत असल्याचं कॅमेरात टीपलं गेलं.  

4/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

यंदाच्या आयपीएलपासून हिरो कॅम पद्धतीने मैदानात असलेल्या एक विशिष्ट खेळाडू मैदानात संपूर्ण काय करतोय यावर लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळेच धोनीचं हे पडद्यामागील नेतृत्व सध्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून व्हायरल झालं आहे.

5/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

धोनी स्टम्पच्या मागून नेहमीप्रमाणे अगदी बॉण्ड्रीवर उभ्या असलेल्या खेळाडूंना नेमकं कुठे उभं राहणं अपेक्षित आहे हे हातवारे करुन सांगताना दिसत आहे.  

6/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

कर्णधार नसताना सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही धोनीला अशी फिल्डींग सेट करताना पाहून त्याचे चाहते सुखावल्याचं पाहायला मिळालं.  

7/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

चाहत्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नसून धोनीची ही अनऑफिशीअल कॅप्टनशीप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर सध्या यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात.  

8/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

धोनी मैदानात कर्णधार करतो त्या साऱ्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात करत होता की सोशल मीडियावर काहींनी ऋतुराजनेच धोनीला मला थोडावेळ कॅप्टन्सी करु दे असं सांगितलं असेल अशी शंका व्यक्त केली आहे.  

9/9

IPL 2023 CSK vs RCB Dhoni Viral Photos

त्यामुळे हा आयपीएल 2024 मधील चेन्नई विरुद्ध बंगळुरुदरम्यानचा पहिला सामना पाहून तरी अनेकांनी यंदाच्या धोनीच्या कथित शेवटच्या पर्वात ऋतुराज ऑन पेपर कॅप्टन असला तरी मैदानात धोनीच कर्णधार असल्याचं म्हटलं आहे. (सर्व फोटो - जीओ सिनेमावरुन साभार)