IND vs SA : केवळ 4 भारतीयांनी केपटाऊनमध्ये खेळाडूंनी झळकावलंय शतक; पाहा कोणाला जमलीये कामगिरी!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.   

Jan 02, 2024, 13:26 PM IST

 

 

1/7

दुसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक क्रिकेट केपटाऊनवर खेळवला जाणार आहे.  

2/7

IND vs SA : टीम इंडियाला 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळाला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत भारताला दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे. केपटाऊनशी संबंधित एक गोष्ट अशी आहे की या मैदानावर आजपर्यंत केवळ 4 भारतीय फलंदाजांना कसोटी शतक झळकावता आले आहे.  

3/7

केपटाऊनमध्ये कसोटी शतक झळकावण्यात यशस्वी ठरलेला एकही खेळाडू सध्याच्या भारतीय संघात नाही हे जाणून आश्चर्य वाटेल. विराट कोहलीने या मैदानावर दोन कसोटी सामने खेळले आहेत, मात्र शतक झळकावण्यात त्याला यश आलेले नाही.  

4/7

सचिन तेंडुलकर : केपटाऊनमध्ये कसोटी सामना खेळताना शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर (169धावा) हा पहिला फलंदाज होता. या मैदानावर भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा तो फलंदाज आहे. त्याच्या नावावर 2 शतके आहेत.  

5/7

मोहम्मद अझरुद्दीन : 1997 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात दोन फलंदाजांनी शतके झळकावली होती. पहिला सचिन तेंडुलकर आणि दुसरा मोहम्मद अझरुद्दीन. अझरुद्दीन (115 धावा) या मैदानावर भारतासाठी दुसरे कसोटी शतक झळकावण्यात यशस्वी झाला.  

6/7

वसीम जाफर : 2007 मध्ये भारताकडून खेळताना अनुभवी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने शतक झळकावले होते. त्याने 116 धावांची खेळी खेळली.  

7/7

ऋषभ पंत : एका भीषण कार अपघातानंतर मैदानातून बाहेर असलेला विकेचकिपर पलांदाज ऋषभ पंतनेही याच मैदानावर शतक झळकावले आहे. त्याने 2022 मध्ये नाबाद 100 धावा केल्या होत्या.