टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI चा मास्टर प्लॅन, ना पांड्या ना सूर्या! रोहितच करणार कॅप्टन्सी?

IND vs AFG T20 Series: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर आता टीम इंडिया अफगाणिस्तानविरूद्ध भिडणार आहे. 11 ते 17 जानेवारी या काळात टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. 3 सामन्यांची ही सिरीज असून कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. 

Surabhi Jagdish | Jan 02, 2024, 11:14 AM IST
1/7

भारतीय कर्णधार रोहित शर्मा मोठ्या विश्रांतीनंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. 

2/7

एका रिपोर्टनुसार, रोहित अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 सिरीजमध्ये परतणार आहे.

3/7

असं मानलं जातंय की, जर रोहित या सिरीजमधून कमबॅक करत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, बीसीसीआय त्याला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कमान देण्याच्या तयारीत आहे.

4/7

इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे.

5/7

या अहवालात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, 'आम्ही रोहित शर्मासोबत चर्चा केली असून तो टी-20 वर्ल्डकपमध्ये कर्णधारपद भूषवण्यास तयार आहे.'

6/7

टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 सिरीज असणार आहे.

7/7

लवकरच बीसीसीआय अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करणार असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.