International Nurses Day : ९ महिन्यांची गर्भवती नर्स हॉस्पिटलमध्ये करतेय रुग्णांची सेवा

कोरोना व्हायरसच्या थैमानात डॉक्टर, नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत आहेत. कित्येक दिवस आपल्या कुटुंबाला, आपल्या मुला-बाळांना सोडून ते रुग्णांच्या सेवेत झटत आहेत. 

May 12, 2020, 16:31 PM IST

आज जागतिक परिचारिका दिनी, डॉक्टर, नर्सेसच्या रुपात देवच अवतरला असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. 

1/4

कर्नाटकातील शिवमोगा येथे रुपा परवीन राव या नर्स नऊ महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्या आपल्या गावातून दररोज जयचामाराजेन्द्र शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी तीर्थहल्ली तालुक्यात प्रवास करतात. 

2/4

रुपा यांच्या वरिष्ठांनी त्यांना अशा अवस्थेत सुट्टी घेण्याचं सांगितलं आहे. परंतु रुपा यांची इच्छाशक्ती अतिशय कणखर असून त्या रुग्णांना सोडून आराम करु इच्छित नाहीत.

3/4

रुग्णालयाच्या आसपास अनेक गावं आहेत, त्या लोकांना आमच्या सेवेची गरज आहे. माझ्या वरिष्ठांनी मला सुट्टी घेण्यास सांगितलं आहे, पण मला रुग्णांची सेवा करायची आहे. मी दिवसातून 6 तास काम करत असल्याचं रुपा यांनी सांगितलं.

4/4

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रुपा यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. रुपा यांनी सांगितलं की, मला मुख्यमंत्र्यांनी बोलवून माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं त्या म्हणाल्या. (फोटो सौजन्य : ANI)