Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांनी गर्दी केली. 

May 11, 2020, 16:21 PM IST

लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील मजूर, कामगार, विद्यार्थी तसेच प्रवासी मुंबईत अडकून आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. राज्य शासनाने ९ मे रोजी मोफत एसटी प्रवासाची घोषणा केली होती. त्यामुळे आज परळ बस स्थानकाबाहेर कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांनी गर्दी केली. 

1/4

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

९ मे नंतरच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी १० मे रोजी आपला हा आदेश फिरवत मोफत एसटीची सेवा फक्त मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी असल्याचा आदेश शासनानं काढला.   

2/4

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

मात्र, या आदेशाची माहिती अद्याप लोकांपर्यंत पोहोचली नसल्यानं त्याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  

3/4

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला येथील नेहरुनगर, ठाण्यातील खोपट, पनवेल  विभागातील एसटी डेपोंमध्ये लोकांनी सोमवारी मोफत एसटी प्रवासाच्या चौकशीसाठी प्रचंड गर्दी केली.   

4/4

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

Lockdown : परळ एसटी डेपोबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी

अखेर शेवटी डेपोत जमलेल्या सर्व प्रवाशांना घरी जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.