International No Diet Day : प्रत्येक शरीर सुंदर आहे; 'या' 5 पद्धतींनी बॉडी पॉझिटिव्हीटीचा करा अभ्यास
International No Diet Day : सुदृढ आरोग्यासाठी फक्त डाएटच हा उत्तम पर्याय आहे. असे अजिबातच नाही. डाएट, क्रॅश डाएटयापेक्षाही काकणभर जास्त महत्त्वाचं आहे शरीराची सकारात्मकता. इंटरनॅशनल नो डाएट डे च्या 2024 च्या निमित्ताने जाणून घेऊया 5 उपाय.
शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. पण झिरो फिगरसाठी, शरीर स्लिम ठेवण्यासाठी त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही. शरीराची फिगर चांगली दिसावी यासाठी अनेकजण क्रॅश डाएट फॉलो करतात आणि शरीरातील महत्त्वाची पोषकतत्त्वे कमी करतात. यामुळे शरीराला आवश्यक त्या पोषकत्त्वांची कमतरता जाणवते. याबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 'इंटरनॅशनल नो डाएट डे' International No Diet Day साजरा केला जातो. यासोबत शरीराला सकारात्मक गोष्टी पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.