INS Mormugao: भारताच्या या बाहुबली युद्धनौकेचे नाव 'मोरमुगाव' का आहे? जाणून घ्या या मागचा इतिहास
INS Mormugao History: मोरमुगाव ही युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. INS मोरमुगाव ही स्वदेशी बनावटीची स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाची सागरी आणि लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी याची निवड केली आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितींमध्ये शत्रूंना धूळ चारू शकते. या युद्धनौकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.. ते म्हणजे त्याचे नाव 'मोरमुगाव'. या युद्धनौकेसाठी मोरमुगाव हे नाव का निवडले आणि त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात
1/6
सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्याच्या भागात वसाहत सुरू केली. तिसवाडी या मध्यवर्ती जिल्ह्यातून त्याची कमान हाती घेतली. आपल्या सागरी वर्चस्वाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या टेकड्यांवर किल्ले बांधले. 1624 मध्ये, त्याने मोरमुगाव बंदराच्या भूमीवर आपले तटबंदी असलेले शहर बांधण्यास सुरुवात केली.
2/6
3/6
1683 मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांना मराठ्यांकडून धोका होता. मात्र मराठ्यांनी आपल्या राज्याचं मुघल सम्राट औरंगजेबापासून रक्षण करण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे पोर्तुगीजांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तत्कालीन पोर्तुगीज शासकांना भारतातील पोर्तुगीजांच्या ताब्यातील राजधानी मोरमुगावच्या किल्ल्यावर हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
4/6
दुसऱ्या महायुद्धात मोरमुगाव बंदर ऑपरेशन क्रीकचे केंद्र होते. या ऑपरेशनचा एक भाग म्हणून, जर्मन व्यापारी जहाज एहरनफेल्सवर बॉम्बफेक करण्यात आली. हे जहाज गुप्तपणे यू-बोट्सपर्यंत माहिती प्रसारित करत होती. गोव्यातील मोरमुगाव खास का आहे हे आता तुम्हाला कळले असेलच. मोरमुगाव हे गोव्यातील सर्वात जुने बंदर देखील आहे. स्वातंत्र्यापूर्वी या बंदरावर शत्रूंची नजर होती.
5/6
6/6