INDvsSA: टीम इंडियाच्या विजयाची ५ कारणं

Feb 17, 2018, 16:40 PM IST
1/5

Now on fast pitches as well

Now on fast pitches as well

टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये २-०ने पराभव झाल्यानंतर पुन्हा पुनरागमन करत वन-डे सीरिज आपल्या नावावर केली. परदेशातही भारतीय स्पिनर्स आपलं चांगलं प्रदर्शन दाखवू शकतात हे सिद्ध केलं आहे. तसेच टॉप ऑर्डर बॅटिंगची समस्याही दूर झाली आहे.

2/5

Virat Dhawan and Rohit

Virat Dhawan and Rohit

या वन-डे सीरिजमध्ये खास गोष्ट अशी की, प्रत्येक मॅचमध्ये भारताच्या टॉप ऑर्डर बॅट्समनने कमीत कमी ३० ओव्हर्स खेळल्या. केवळ सेंच्युरियन मैदान वगळता इतर मैदानात टॉपच्या तीन बॅट्समनपैकी एकाने सेंच्युरी लगावली. विराट कोहलीने पहिल्या मॅचमध्ये ११२ रन्स, तिसऱ्या वन-डे मध्ये १६० रन्स आणि सहाव्या वन-डे मध्ये १२९ रन्सची इनिंग खेळली. तर, पिंक वन-डे मध्ये भारत पराभूत झाला असला तरी शिखर धवनने १०९ रन्स केले. पाचव्या वन-डेमध्ये रोहित शर्माने ११५ रन्स केले.

3/5

Kuldeep yadav top performer

Kuldeep yadav top performer

सीरिजमध्ये भारताच्या दोन्ही स्पिनर्सने चांगली बॉलिंग केली. स्पिनर्सच्या बॉलिंगला आफ्रिकन बॅट्समन चांगलेच हैराण झाले होते. कुलदीप यादवने सहा मॅचेसमध्ये १३.८८ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतले. तसेच कुलदीपने दोन वेळा चार विकेट्सही घेतले.

4/5

Yuzvendra chahal

Yuzvendra chahal

कुलदीप यादवसोबतच युजवेंद्र चहलनेही चांगलं प्रदर्शन केलं. चहलने सहा मॅचेसमध्ये १६.३७ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतले. यामध्ये एकदा पाच विकेट्स आणि एकदा चार विकेट्स युजवेंद्रने घेतले.

5/5

Virat dominating in batting

Virat dominating in batting

टीम इंडियाच्या यशाचं आणखीन एक कारण म्हणजे कॅप्टन विराट कोहलीचा फॉर्म. विराटने या सीरिजमध्ये ३ सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी करत ५५८ रन्स केले. हा स्कोअर द्विपक्षीय सीरिजमधील हे सर्वाधिक ठरला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने १७,००० रन्स पूर्ण करणारा बॅट्समनही विराट ठरला आहे.