टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कॅप्टनच्या हृदयात छिद्र, IPL ला मुकणार?

Yash dhull diagnosed with hole in the heart : 2022 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा कॅप्टन यश धुळ सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. दिल्ली प्रिमियर लीगमध्ये यश धुळने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना आपल्या बॅटिंगची पोजिशन देखील बदलली. 

Saurabh Talekar | Aug 28, 2024, 18:43 PM IST
1/6

यश धूळ

एवढंच नाही तर त्याला टी-20 लीगच्या 5 व्या सामन्यापासून आराम देखील दिला गेला आहे. त्यानंतर यश धूळने याचं कारण सांगत खुलासा केला आहे. 

2/6

हृदयाची सर्जरी

माझ्यासाठी गेली 2 महिने खूप कढीण होते. मला हृदयाच्या सर्जरीला सामोरं जावं लागलं होतं. माझ्या हृदयाला छिद्र होतं, त्यामुळे सर्जरी करण्यात आली होती. यश शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतला. 

3/6

यशला काय झालंय?

भारताच्या 19 वर्षाखालील माजी कर्णधाराने या लीगमधील पाच डावांत 20 च्या सरासरीने केवळ 93 धावा केल्या. त्यामुळे यशला काय झालंय? असा सवाल विचारला जात होता. 

4/6

रिकव्हरी

ईस्ट दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात यश धूळ याने उत्तर देताना आणखी थोडा वेळ लागेल, असं वक्तव्य केलंय. मी इथे रिकव्हरीसाठी आलो आहे, असंही यश धूळने म्हटलंय. 

5/6

100 टक्के प्रयत्न

पण मी खेळाप्रती पॉझिटिव्ह आहे आणि मी खेळासाठी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काळात मी पूर्णपणे रिकव्हर होईल, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केलाय.

6/6

एनसीए

दरम्यान, एनसीएची मेडिकल टीम नियमित चेकअप करताना त्यांना यशच्या हृदयात छिद्र असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दिल्लीत त्याची सर्जरी झाली.