जगातील सगळ्यात मोठी चपाती, वर्षभर राहते चविष्ट; बनवणारे आणि विकणारे दोघेही होतात करोडपती

संपूर्ण जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहित नाही. त्यापैकी एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे एक चपाती आहे ती इतकी मोठी असते की आपल्या आठ चपात्या होतील. त्याचा आकार हा सामान्य चपातीच्या तुलनेत आठपठ जास्त असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चपाती ही यूनेस्कोनं त्यांच्या वारसा हक्क यादीत सहभागी केली आहे. 

| Aug 28, 2024, 17:36 PM IST
1/7

चपाती ही संपूर्ण जगात खाल्ली जाते. प्रत्येक देशात चपातीचा एक वेगळा प्रकार बनवण्यात येतो. पण तुम्हाला माहित आहे का की आर्मेनियामध्ये एक असा चपातीचा प्रकार आहे ज्याचा आकार इतका मोठा असतो की सगळ्यांना आश्चर्य होते? 

2/7

ही चपाती सर्वसाधारण चपातीच्या तुलनेत आठ ते दहापट जास्त मोठी असते. चला तर या चपातीविषयी जाणून घेऊया. 

3/7

एका रिपोर्टनुसार, आर्मेनियाच्या या लोकप्रिय असलेल्या चपातीला 'लावश' असं म्हणतात. ही चपाती जगातील सगळ्यात मोठ्या चपात्यांपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चपाती तंदूरमध्ये बनवण्यात येते. 

4/7

ही चपाती सगळ्यात आझी आर्मेनियामध्ये बनवण्यात आली. दरम्यान, ही चपाती अजरबैजान, इरान आणि तुर्कीमध्ये देखील लोकप्रिय आहे. 

5/7

त्याचे सांस्कृतिक महत्त्व पाहाता त्याचं जागतिक वासरा यादीत देखील सहभागी करण्यात आले आहे. ही चपाती फक्त चविष्ट नसते तर त्यासोबत अनेक सांस्कृतिक परंपरांशी त्याचा संबंध आहे. ही चपाती बनवल्यानंतर त्याला फोल्ड करत आणि पॅक करत बराचकाळ ठेवण्यात येतं. लवाश, पीठ, पाणी, यीस्ट, साखर आणि मीठ मिक्स करून ही चपाती बनवण्यात येते. 

6/7

अनेक ठिकाणी ही चपाती यीस्ट आणि साखरेशिवाय देखील बनवतात. तर ही चपाती चविष्ट बनवण्यासाठी तंदूरमध्ये टाकण्याआधी त्यावर तिळ आणि खसखस वरुन टाकण्यात येतं. या चपातीला दोन्ही बाजूनं पसरवून तंदूरमध्ये शिजवण्यात येतं. तर ही नरम रहावी यासाठी त्याला फोल्ड करून पॅक करण्यात येतं. 

7/7

तुम्ही वर्षभर ही चपाती खाऊ शकता. काही काळानंतर तुम्ही याला पापडसारखं खाऊ शकता आणि तेव्हाही ही चपाती तितकीच चविष्ट लागते. असं म्हटलं जातं की ही चपाती खरेदी करणारे आणि विकणारे हे कोट्याधीश असतात.