स्ट्रीट फूडच्या देशा! भारतामधील या 7 Street Food Dishes एकदा तरी ट्राय कराच

Best Indian Street Foods: भारतामध्ये दर बारा कोसावर भाषा आणि संस्कृती बदलते असं म्हटलं जातं. मात्र याचबरोबर दर कोसावर खाद्यसंस्कृतीही बदलते. भारतामधील प्रत्येक राज्याची आपली विशेष अशी खाद्यसंस्कृती आहे. अर्थात सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये या खाद्यसंस्कृतीचा विचार करताना स्ट्रीट फूडही विचारात घेणं आवश्यक आहे. भारतामधील मेट्रो शहरांबरोबरच छोट्या शहरांमधील स्ट्रीट फूडही चांगलेच प्रसिद्ध आहे. हे पदार्थ कोणते आणि ते कुठे लोकप्रिय आहेत पाहूयात...

Swapnil Ghangale | Jun 15, 2023, 16:53 PM IST
1/16

Indian Street Food Must Try Dishes

Must Try Indian Street Food: भारतामधील स्ट्रीट फूड इतकी व्हरायटी इतर कोणत्याही देशात मिळणार नाही, असं म्हटलं जातं. भारतामध्ये खरोखरच अनेक प्रकारचे पदार्थ स्ट्रीट फूड कॅटेगरीमध्ये मोडतात. यापैकीच काही सर्वात लोकप्रिय पदार्थांवर टाकलेली नजर. यापैकी तुम्ही किती पदार्थ खाल्ले आहेत हे संपूर्ण यादी पाहिल्यानंतर कमेंट करुन नक्की सांगा.

2/16

Indian Street Food Must Try Dishes

गुजरातमधील लोकप्रिय स्ट्रीट फूडमध्ये आवर्जून नाव घ्यावं लागेल असा पदार्थ म्हणजे फाफडा!

3/16

Indian Street Food Must Try Dishes

बेसन पीठ, हळद आणि जिरं घालून बनवलेला फाफडा हा मागील काही वर्षांमध्ये भारतभरामध्ये लोकप्रिय झाला आहे. तळलेला हा पदार्थ फारच चविष्ट आहे.

4/16

Indian Street Food Must Try Dishes

अनेकदा फाफड्याबरोबरच पपईची चटणी आणि हिरव्या मिर्च्या दिल्या जातात. तिखट खाण्याची आवड असणाऱ्यांनाही हा स्ट्रीट फूडचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

5/16

Indian Street Food Must Try Dishes

तसं बघायला गेलं तर मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर स्ट्रीट फूडसाठी फार प्रसिद्ध आहे. मात्र हे शहर एका खास स्ट्रीट फूडसाठी ओळखलं जातं.

6/16

Indian Street Food Must Try Dishes

इंदूरमधील हा खास पदार्थ म्हणजे पोहे. इंदूरला आले आणि पोहे नाही खाल्ले तर काय केलं? असं मजेत म्हटलं जातं. इंदूरमधील पोहे हे जगात भारी असतात असं खवय्ये म्हणतात. त्यामुळे कधी इंदूरला गेलात तर पोहे नक्की ट्राय करा.

7/16

Indian Street Food Must Try Dishes

कोलकात्यामधील लोकप्रिय स्ट्रीट फूडच्या यादीमध्ये झालमुरीचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर झालमुरी म्हणजे सुकी भेळ.

8/16

Indian Street Food Must Try Dishes

या भेळीमध्ये कुरमुरे, हिरवी मिर्ची, कांदा, काकडी, टोमॅटो आणि मसाले टाकले जातात. झालमुरी चवीला फारच भन्नाट लागते. 

9/16

Indian Street Food Must Try Dishes

भारतीय लोकप्रिय स्ट्रीट फूडच्या यादीमध्ये वडापावचा समावेश नसेल तर ती यादी पूर्ण होणार नाही. मुंबईकरांसाठी जेवण, नाश्ता, मधल्या वेळेतील खादाडीसाठीचा पर्याय असं सर्वकाही असणारा पदार्थ म्हणजे वडापाव!

10/16

Indian Street Food Must Try Dishes

स्वस्तात मस्त आणि पोटभरीचं खाणं म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती वडापावलाच आहे. मुंबईत आल्यानंतर वडापाव एकदा तरी ट्राय केला पाहिजे असं आवर्जून सांगितलं जातं.

11/16

Indian Street Food Must Try Dishes

वडापाव बरोबर दिली जाणारी हिरवी आणि गोड चटणीही अनेकांना फार आवडते. अनेक ठिकाणी या पारंपारिक चटण्यांबरोबर प्रायोगिक स्वरुपाच्या चटण्याही दिल्या जातात. चटणी असो किंवा नसो वडापाव चवीला बेस्टच असतो यात दुमत नाही.

12/16

Indian Street Food Must Try Dishes

मुंबईकरांच्या मनात जे स्थान वडापावला आहे तेच स्थान दिल्लीकरांच्या मनात छोले भटुऱ्यांसाठी आहे.  

13/16

Indian Street Food Must Try Dishes

दिल्लीकरांच्या आवडत्या नाश्त्यांमध्ये छोले-भटुऱ्याचा आवर्जून समावेश होतो. काबुली चण्यांची भाजी आणि त्याबरोबर मोठ्या आकाराच्या पुऱ्या म्हणजेच भुटरे खाल्यानंतर जेवणाची गरज राहत नाही.

14/16

Indian Street Food Must Try Dishes

वडापावबरोबर चटणी दिली जाते तसं छोटे भटुऱ्याबरोबर कांदा आणि चटणी दिली जाते. दिल्लीकरांचं हे आवडतं स्ट्रीट फूड राजधानीत गेल्यानंतर आवर्जून ट्राय केलं पाहिजे.

15/16

Indian Street Food Must Try Dishes

याचबरोबर भारतामध्ये आवर्जून खाल्लं जाणारं स्ट्रीट फूड म्हणजे सामोसा. भारतातील जवळजवळ सर्वच भागांमध्ये सामोसा मिळतो. मात्र प्रामुख्याने उत्तर भारतामधील सामोश्याची चव फारच उत्तम लागते.

16/16

Indian Street Food Must Try Dishes

मुंबईमधील लोकप्रिय स्ट्रीट फूडमध्ये पाणीपुरीचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. गोलगप्पे, कुलचा नावाने उत्तर भारतामध्ये पाणीपुरे खाल्ली जाते.