'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच

Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत. 

| Sep 15, 2023, 16:04 PM IST

Women in Indian railway:मुंबईचे माटुंगा रेल्वे स्थानक हे अतिशय अनोखे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत.

1/7

'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्व महिलाच

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

देशातील अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत जिथे तुम्हाला 'महिला राज' पाहायला मिळेल. येथे सर्व पोस्टवर पुरुष नव्हे तर महिलाच काम करताना दिसतात. अशा स्थानकांबद्दल माहिती घेऊया. 

2/7

मुंबईचे माटुंगा रेल्वे स्थानक

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

मुंबईचे माटुंगा रेल्वे स्थानक हे अतिशय अनोखे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत. 

3/7

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

सुरुवातीला माटुंगा येथे एकूण 41 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये या स्थानकाचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले.

4/7

जयपूरमधील गांधी नगर

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

जयपूरमधील गांधी नगर रेल्वे स्थानकावरही महिला तैनात आहेत. येथे स्टेशन अधीक्षकांपासून मुख्य तिकीट कलेक्टरपर्यंतच्या पदांवर महिला विराजमान आहेत. 2018 मध्ये रेल्वेकडून प्रत्येक पोस्टवर महिलांना तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

5/7

नागपूरचे अजनी

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

नागपूर अजनी हे देशातील तिसरे रेल्वे स्थानक आहे जिथे केवळ महिलाच तैनात करण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणासंदर्भात रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आहे.

6/7

अहमदाबादचे मणिनगर

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

अहमदाबादचे मणिनगर हे देशातील चौथे रेल्वे स्थानक आहे. जिथे सर्व जबाबदारी फक्त महिलांच्या खांद्यावर आहे. हे स्थानक पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येते.

7/7

गुंटूर रेल्वे स्थानक

Indian railway Women Work as ticket counter to TTE at this stations

दक्षिण मध्य रेल्वेचे गुंटूर रेल्वे स्थानक हे असेच एक रेल्वे स्थानक आहे. जिथे सर्व पदांवर महिलांना तैनात करण्यात आले आहे.