PHOTO: भारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालक
एकमेव भारतीय ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. हा व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा व्यापारी नाहीये तर एक सामान्य शेतकरी आहे. तो संपूर्ण ट्रेनचा मालक आहे. कोण आहे हा व्यक्ती जाणून घेऊया. रेल्वे तुमची संपत्ती आहे.
Indian Railway Interesting FActs: एकमेव भारतीय ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. हा व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा व्यापारी नाहीये तर एक सामान्य शेतकरी आहे. तो संपूर्ण ट्रेनचा मालक आहे. कोण आहे हा व्यक्ती जाणून घेऊया. रेल्वे तुमची संपत्ती आहे.
1/7
भारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालक
रेल्वे तुमची संपत्ती आहे... अशी अनाउंसमेंट आपण नेहमीच ऐकतो. पण याचा अर्थ आपण खरंच रेल्वेचे मालक आहोत असा नाही. रेल्वेवर भारत सरकारचा मालकी हक्क आहे. मात्र देशात असा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे ट्रेनचे संपूर्ण मालकी हक्क आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या एका चुकीमुळं तो व्यक्ती संपूर्ण ट्रेनचा मालक झाला. आणि याला कायदेशीर मान्यतादेखील मिळाली आहे.
2/7
3/7
4/7
लुधियाना-चंदीगढ रेल्वे मार्गासाठी 2007मध्ये रेल्वेने शेतकऱ्यांच्या काही जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण सिंह यांची जमीनही त्याच मार्गावर होती. रेल्वेने 25 लाख रुपये देईन त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण सिंह यांना लक्षात आलं की, रेल्वेने तितकीच जमीन शेजारच्या गावात 71 लाख रुपये प्रति एकरमध्ये खरेदी केली आहे.
5/7
रेल्वेच्या या भूमिकेविरोधात संपूर्ण सिंह कोर्टात गेले. कोर्टाच्या सुनावणीत रेल्वेने त्यांना नुकसानभरपाई म्हणून 25 लाखांचे 50 लाख रुपये देण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्यांनतर ती रक्कम वाढून 1.47 कोटी इतकी झाली. कोर्टाने नॉर्थ रेल्वेला आदेश दिले की 2015पर्यंत संपूर्ण सिंह यांना तितकी रक्कम देण्यात यावी. मात्र रेल्वेने फक्त 42 लाख रुपये दिले व 1.05 कोटी रुपये देण्यास असमर्थ ठरले.
6/7