Indian Railway: फुकट प्रवास करायचाय? तर मग 'ही' ट्रेन गाठाचं...

वाढत्या महागाईच्या काळात  'या' ट्रेनमधून करा मोफत प्रवास... 

Apr 29, 2022, 11:06 AM IST

Indian Railway: भारतीय रेल्वे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात एकूण 12,167 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. याशिवाय भारतात 7 हजार 349 मालगाड्या आहेत. भारतात सर्व सामान्य लोकांना लांबचा पल्ला गाढायचं असेल, तर ट्रेन उत्तम पर्याय आहे. देशात ऐकीकेड टिकीटांच्या दरात भाडेवाढ होत आहे, तर दुसरीकडे अशी एक ट्रेन आहे, जिच्यामधून तुम्ही-आम्ही मोफत प्रवास करू शकतो. आज आपण त्याचं ट्रेनबद्दल जाणून घेवू...

 

1/5

ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. जर तुम्ही भाक्रा नागल धरण बघायला गेलात तर तुम्ही या ट्रेन प्रवासाचा मोफत आनंद घेऊ शकता. ही रेल्वे नागल ते भाक्रा धरणापर्यंत धावते. गेल्या 73 वर्षांपासून 25 गावांतील लोक या ट्रेनमधून मोफत प्रवास करत आहेत.  

2/5

 ही ट्रेन भाक्रा धरणाची माहिती देण्याच्या उद्देशाने चालवली जाते. देशातील सर्वात मोठे भाक्रा धरण कसे बांधले गेले हे देशातील भावी पिढीला कळू शकेल. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ ही ट्रेन चालवते. हा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी डोंगरातून दुर्गम मार्ग तयार करण्यात आला.  

3/5

गेली 73 वर्षे  ही रेल्वे धावत आहे. ही रेल्वे पहिल्यांदा 1949 मध्ये चालवण्यात आली. या ट्रेनमधून दररोज 25 गावातील 300 लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो.  

4/5

 ट्रेन डिझेल इंजिनवर चालते. या  एका दिवसात 50 लिटर डिझेल लागते. या गाडीचे इंजिन सुरू झाले की, भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते.   

5/5

या ट्रेनमधून भाक्रा येथील बरमाळा, ओलिंडा, नेहला भाक्रा, हंडोळा, स्वामीपूर, खेडा बाग, कलाकुंड, नांगल, सालंगडी आदी परिसरातील गावांतील लोक प्रवास करतात.