PHOTO: 'तत्काल'साठी भलीमोठी रांग नको! 'असं' मिळेल ट्रेनचं कन्फर्म तिकीट

Confirm Train Ticket Booking Tips: कन्फर्म तिकीट मिळण्याआधीच तिकीट बुकींग फूल्ल झालेली असते. आणि आपली तिकीट वेटींगवर येते. अशावेळी आपली डोकेदुखी खूप वाढते. अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही.

| May 13, 2024, 11:57 AM IST
1/9

'तत्काल'साठी भलीमोठी रांग नको! 'असं' मिळेल ट्रेनचं कन्फर्म तिकीट

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

Confirm Ticket Tricket:  सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणे खूपच कठीण असते. तुम्ही आता गणपतीला गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुकींग करत असाल तर तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला आहे. 

2/9

बुकींग फूल्ल

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

कन्फर्म तिकीट मिळण्याआधीच तिकीट बुकींग फूल्ल झालेली असते. आणि आपली तिकीट वेटींगवर येते. अशावेळी आपली डोकेदुखी खूप वाढते. अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही.

3/9

ट्रीक वापरा

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

असे असताना आपल्यासमोर तत्काल बुकिंगचा पर्यायही उपलब्ध असतो.  पण तत्काल बुकिंग करणं इतकं सोपं नाही. पण एक ट्रीक वापरुन तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

4/9

तत्कालचा त्रास जा विसरुन

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाच्या तारखेच्या 1 दिवस आधी तत्काल तिकीट बुक करावे लागेल. असे असले तरी तत्कालसाठीदेखील प्रवाशांची मागणी जास्त असते. त्यामुळे तत्काल बुकींग करणं अजिबात सोपं नसतं. 

5/9

बुकींग एजंटांकडून बुकींग

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

तत्काल तिकीट मिळण्यासाठी सकाळी 5 ते 6 वाजल्यापासून विंडोजवळ रांग लावावी लागते. त्यानंतर 10 ते 11 वाजता बुकींग सुरु होतं.  सर्व तत्काल तिकिटे बुकींग एजंटांकडून बुक केली जातात, असा आक्षेप सर्वसामान्यांकडून नेहमी घेतला जातो. 

6/9

करंट तिकीट म्हणजे काय?

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

रेल्वेकडून करंट तिकीट बुकिंग सुरू केले आहे. ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये आणि प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय. यामध्ये तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी ते पाच मिनिटांपूर्वीदेखील तिकीट बुक करू शकता.

7/9

कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

करंट तिकिटाची एक चांगली गोष्ट म्हणजे तत्काल किंवा प्रीमियम तत्कालच्या विपरीत प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.

8/9

खात्रीपूर्वक तिकीट मिळवण्याचा मार्ग

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

तत्काल तिकिटाच्या तुलनेत करंट तिकिटात कन्फर्म तिकीट बुक करणे सोपे आहे. उपलब्धतेनुसार, तुम्हाला यामध्ये कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते.

9/9

बुकिंग कुठे केले जाते?

Indian Railway Current Confirm Ticket Trick Marathi News

तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा रेल्वे तिकीट आरक्षण बुकिंग काउंटरवरून करंट तिकिट सहजपणे बुक करू शकता.