सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

Dec 26, 2020, 13:46 PM IST
1/7

एम.एस धोनी - (लेफ्टिनेंट कर्नल, भारतीय सेना)

एम.एस धोनी - (लेफ्टिनेंट कर्नल, भारतीय सेना)

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी एम.एस धोनीला लहानपणापासूनच आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. भारतीय टीमला त्याने मोठ्या उंचीवर नेलं. 2015 मध्ये त्याला भारतीय लष्करात लेफ्टिनेंट कर्नल पोस्टवर नियुक्त करण्यात आलं. तो अनेकदा जवानांसोबत वेळ घालवताना दिसतो.

2/7

सचिन तेंडुलकर - (ग्रुप कॅप्टन, इंडियन एयर फ़ोर्स)

सचिन तेंडुलकर - (ग्रुप कॅप्टन, इंडियन एयर फ़ोर्स)

भारतीय टीमचा आदर्श क्रिकेटर आणि जगभरातील अव्वल खेळाडूं पैकी एक असलेला सचिन तेंडुलकर हा एअर फोर्समध्ये ग्रुप कॅप्टन आहे.  2010 मध्ये त्याला इंडियन एयर फ़ोर्समध्ये ग्रुप कॅप्टन करण्यात आलं होतं.

3/7

हरभजन सिंह - (डीएसपी, पंजाब पोलीस)

हरभजन सिंह -  (डीएसपी, पंजाब पोलीस)

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंहने देशासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 700 विकेट घेतले आहेत. यामुळे त्यांना पंजाब पोलिसांत डीएसपी बनवलं गेलं.  

4/7

कपिल देव - (लेफ्टिनेंट कर्नल, इंडियन आर्मी)

कपिल देव - (लेफ्टिनेंट कर्नल, इंडियन आर्मी)

कपिल देव हे भारतीय क्रिकेटला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे कर्णधार आहेत. ऑलराउंडर म्हणून त्यांचं योगदान होतं. त्यामुळे त्यांना 2008 मध्ये इंडियन आर्मीमध्ये लेफ्टिनेंट कर्नल पद देऊन गौरवण्यात आलं. 2019 मध्ये कपिल देव यांना हरियाणा स्पोर्ट्स यूनिवर्सिटीच्या चांसलर म्हणून नियुक्त केले गेले.

5/7

उमेश यादव - (असिस्टंट मॅनेजर, भारतीय रिजर्व बँक)

उमेश यादव - (असिस्टंट मॅनेजर, भारतीय रिजर्व बँक)

टीम इंडियाला अनेक वेळा विजय मिळविण्यात उमेश यादवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लहानपणापासूनच या स्टारला सैन्यात काम करायचे होते, पण तसे झाले नाही. २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर हे पद देण्यात आले.

6/7

जोगिंदर शर्मा - (डीसीपी, हरियाणा पोलीस)

जोगिंदर शर्मा - (डीसीपी, हरियाणा पोलीस)

2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जोगिंदर शर्माने भारतीय संघासाठी शेवटची ओव्हर टाकलीक आणि संघ जिंकला. तो जास्त काळ संघात राहिला नाही. पण आता जोगिंदर हरियाणा पोलिसात डीसीपी म्हणून कार्यरत आहेत.

7/7

युजवेंद्र चहल - (निरीक्षक, आयकर विभाग)

युजवेंद्र चहल - (निरीक्षक, आयकर विभाग)

युजवेंद्र चहलने अगदी थोड्या वेळात टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा फिरकीपटू मर्यादित षटकात टीम इंडियाची पहिली पसंती असून त्याच्या फिरकीच्या जादूने युझवेंद्रने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय चहल आयकर विभागात निरीक्षक म्हणून तैनात आहे. फारच थोड्या लोकांना ही माहिती आहे.