या भारतीय क्रिकेटर्सने केलेले कधीही मोडले न जाणारे रेकॉर्ड

Aug 12, 2020, 11:17 AM IST
1/6

सचिन तेंडुलकरचे 100 शतके

सचिन तेंडुलकरचे 100 शतके

भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान सलामीवीर सचिन रमेश तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणतात. सचिनने अनेक रेकॉर्ड नोंदवले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकीय खेळीचा हा खास विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे कठीण आहे. सचिनशिवाय इतर कोणत्याही क्रिकेटपटूने हा विक्रम केलेला नाही.

2/6

महेंद्र सिंह धोनी : 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार

महेंद्र सिंह धोनी : 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार

जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल बोलले जाते, तेव्हा त्या यादीतील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असेल. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय क्रिकेटची व्याख्या बदलली. कारण माही जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याच्याकडे तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे. 2007 मध्ये टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून धोनीने इतिहास रचला. याशिवाय त्याने कसोटीत टीम इंडियाला नंबर 1 बनवून आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदाही मिळविली.

3/6

राहुल द्रविड : टेस्टमध्ये सर्वाधिक बॉल खेळणारा खेळाडू

राहुल द्रविड : टेस्टमध्ये सर्वाधिक बॉल खेळणारा खेळाडू

राहुल द्रविड उत्कृष्ट फलंदाज, बचावात्मक शॉट्स आणि कौशल्यपूर्ण खेळांसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात द्रविड क्रीझवर चिकटून राहायचा तेव्हा विरोधी संघाच्या गोलंदाजांना त्याला बाद करण्यासाठी काय करावे हे कळत नसायचे. यामुळेच राहुल द्रविडला टीम इंडियाची 'वॉल' म्हटले गेले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल खेळण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 31,258 बॉल खेळले आहेत. राहुल द्रविडने जवळपास 5,210 षटकांचा सामना केला.

4/6

रोहित शर्मा: वनडेमध्ये 3 दुहेरी शतक

रोहित शर्मा: वनडेमध्ये 3 दुहेरी शतक

हिटमॅन रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. ज्यापैकी एक असलेला वनडे क्रिकेटमध्ये 3 दुहेरी शतकांचा विक्रम. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 रन केले आहेत.

5/6

अजिंक्य रहाणे : एका टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच

अजिंक्य रहाणे : एका टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच

अजिंक्य रहाणे हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. परंतु रहाणेच्या नावे हा विक्रम फलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात आहे. 2015 मध्ये अजिंक्य रहाणेने कसोटीदरम्यान श्रीलंकेच्या सर्वाधिक फलंदाजांना झेलबाद केले होते, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही नॉन विकेटकीपर फील्डरसाठी विक्रम करणारा ठरला आहे. रहाणेने श्रीलंकेच्या संघाच्या पहिल्या डावात 3 कॅच आणि दुसर्‍या डावात 5 कॅच घेतले होते.

6/6

अनिल कुंबळे : टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये १० विकेट

अनिल कुंबळे : टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये १० विकेट

भारतीय क्रिकेट इतिहासातील महान लेगस्पिनर अनिल कुंबळे हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. जम्बोने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी, कुंबळेने आपल्या करिष्माई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 10 विकेट्स घेत संपूर्ण संघ बाद केला होता. अनिल कुंबळे यांनी 7 फेब्रुवारी 1999 रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर ही कामगिरी केली. जेव्हा कुंबळेने पाकिस्तान संघाविरुद्ध 26.3 षटकांत 74 धावा देऊन 10 विकेट घेतले होते.