Rishabh Pant: ऋषभ पंतने अचानक बदलली जन्मतारीख; नेमकं कारण काय?

Rishabh Pant Date Of Birth: ऋषभ पंतने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमध्ये आपली जन्मतारीख बदलली आहे.

Jun 28, 2023, 22:10 PM IST

Rishabh Pant Updates birthday date: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुडकी येथे झाला होता. मात्र, ऋषभ पंतने थेट तारीखच बदलल्याचं पहायला मिळतंय.

1/5

ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. अशा परिस्थितीत, त्याने आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमध्ये आपली जन्मतारीख बदलली आहे.

2/5

दिल्लीहून रुडकीला कारमधून एकटाच घरी जात असताना ऋषभचा अपघात झाला होता. त्याला त्याच्या आईला नवीन वर्षाचं सरप्राईज द्यायचं होतं.

3/5

अनेक शस्त्रक्रिया झाल्यानंतर ऋषभ पंत एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. जणू काही त्याचा नवीन पुनर्जन्म झालाय. 

4/5

ऋषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे बायो बदलताना महत्त्वाची तारीख नमुद केली, 'दुसरी जन्मतारीख - 5 जानेवारी 2023', असं ऋषभ पंतने लिहिलं आहे.

5/5

देवाच्या कृपेने आणि वैद्यकीय पथकाच्या पाठिंब्याने मी लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास ऋषभ पंतने व्यक्त केला होता.