'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

Oct 15, 2018, 13:17 PM IST
1/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

क्रिकेट हा खेळ जरी गोऱ्या साहेबांचा खेळ म्हणून ओळखला जात असता तरीही त्यामध्ये भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी प्रचंड लक्षवेधी ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये वर्षानुवर्षे बदल होत राहिले. त्या बदलामुळेच नव्या जोमाचे आणि कौशल्याचे खेळाडू सर्वांपर्यंत पोहोचले. अशा या खेळांडूंपैकीच एक नाव म्हणजे गौतम गंभीर. 

2/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

भारतीय क्रिकेट संघाच ओपनिंगसाठी येत एक संयमी पण तितकीच प्रभावी सुरुवात करुन देण्यासाठी गौतम ओळखला जातो. आज वयाच्या 37 व्या वर्षीही गौतम त्याच्या प्रामाणिकपणासाठी, मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या वर्तणूकीसाठी ओळखला जातो. भारतीय क्रिकेट संघातील विश्वासू खेळाडू म्हणून त्याचा नावलौकिक आहे. 

3/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

आपल्या कारकिर्दीत बऱ्याच लक्षवेधी खेळी खेळणाऱ्या गौतमने २००७ टी20 विश्वचषक आणि २०११ च्या विश्वचषकात त्याची उल्लेखनीय कामगिरी कोणीही विसरु शकलेलं नाही. 

4/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

एक चांगला क्रिकेटपटू असण्यासोबतच गौतम हा सच्चा राष्ट्रप्रेमीही आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून याचा सहज अंदाज लावता येतो. विविध समाजोपयोगी कामं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये गरज पडेलस तेव्हा त्याचं मोलाचं योगदान पाहायला मिळतं 

5/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

२००८ मध्ये त्याला भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 

6/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

गौतमच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर अवघ्या १८ दिवसांचा असताना त्याला आजी- आजोबांकडून दत्तक घेण्यात आलं होतं. त्याच्या जन्माच्या अठरा दिवसांनंतर आई त्याचा घेऊन घरी जात होती. त्यावेळी बाळाचा चेहरा दाखवण्यासाठी म्हणून आजी- आजोबांकडे थांबले. त्याचवेळी आजी- आजोबांनी तो आपल्यासोबत आणखी काही काळ रहावा अशी इच्छा व्यक्त केली.

7/7

'या' भारतीय क्रिकेटपटूचा आज वाढदिवस, १८ दिवसांचा असताना आजीआजोबांकडून दत्तक

गौतम हा त्याच्या सढळ हातांनी मदत करण्याच्या वृत्तीसाठीही ओळखला जातो. गरीब आणि गरजूंना मोफत अन्न मिळावं म्हणून त्याने काही व्यवस्था करुन ठेवल्या आहेत. जीजी फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत तो हे समाजकार्य करत असतो.