Indian Celebrities Worked in Pakistan Films : भारतातील 'या' कलाकारांनी केले पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम!

Indian Celebrities Worked in Pakistan Films : कलाकार हा कोणत्या एका स्क्रिनसाठी बनलेला नसतो. कलाकार हे कोणत्याही स्क्रिनवर काम मिळालं की काम करतात. अनेक पाकिस्तानी कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पण तुम्हाला माहितीये का? की बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी खरंच पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. 

Mar 27, 2023, 18:03 PM IST
1/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

किरण खेर: अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांनी 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खामोश पानी' या पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे.   

2/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

नसीरुद्दीन शाह: बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'खुदा' या पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे. फक्त 'खुदा' नाही तर त्याशिवाय 'जिंदा भाग' या चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे. 

3/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

विनोद खन्ना: बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) यांनी पाकिस्तानी चित्रपट 'गॉडफादर' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्याकाळात पाकिस्तानमध्ये विनोद खन्ना यांचे लाखो चाहते होते. 

4/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

ओम पुरी: अभिनेता ओम पुरी (Om Puri) यांनी 'इन लॉ' या चित्रपटासोबत अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले होते. 

5/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

गुलशन ग्रोवर: बॉलिवूडचे बॅडमॅन म्हणून ओळख असणाऱ्या गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) यांनी 'विरसा' या चित्रपटात काम केले होते.   

6/6

Indian Celebrities Worked in Pakistan Films

श्वेता तिवारी: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) नं 'सल्तनत'या पाकिस्तानी चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता.