IND vs AUS: वनडे वर्ल्डकपचा बदला आता टी-20 मध्ये? 'या' दिवशी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान

IND vs AUS: आत्तापर्यंत 3 टीम्सने T20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. ज्यामध्ये भारताव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची टीम आहे. 

Surabhi Jagdish | Jun 13, 2024, 11:02 AM IST
1/7

अमेरिकेविरूद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता भारताचा सुपर 8 मध्ये कोणाशी सामना होणार आहे हे निश्चित झालंय. 

2/7

आयसीसीच्या निर्णयानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

3/7

दोन्ही टीममधील हा सामना 24 जून रोजी सेंट लुसियाच्या मैदानावर होणार आहे. 

4/7

सुपर 8 मधील टीम इंडियाचा हा तिसरा आणि शेवटचा सामना असणर आहे. यापूर्वी टीम इंडियाला आणखी 2 सामने खेळावे लागणार आहे. 

5/7

टीम इंडिया सुपर 8 टप्प्यातील पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे. तर त्यानंतर 22 जून रोजी अँटिग्वामध्ये पुढील सामना खेळणार आहे. 

6/7

भारतीय टीमला अ गटातील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना सामना कॅनडाच्या टीमशी होणार असून हा 15 जून रोजी फ्लोरिडाच्या मैदानावर खेळला जाईल. 

7/7

यानंतर टीम इंडिया आपले पुढील सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यासाठी रवाना होईल.