IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध 'या' पाच खेळाडूंचं चमकलं नशीब, टीम इंडियाची दारं उघडली

 बांगलादेशविरुद्ध 'या' पाच खेळाडूंचं नशीब चमकल आहे. टीम इंडियाची दारं यांच्यासाठी उघडली आहेत.  

Sep 08, 2024, 23:55 PM IST

India vs Bangladesh 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या मालिकेसाठी पाच खेळाडूंचं नशिब चमकलंय.

1/5

ध्रुव जुरैल

सरफराजप्रमाणे ध्रुव जुरैल याच्यावर देखील रोहित शर्माने पुन्हा संधी दिली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ध्रुवची बॅट चालली नव्हती. परंतू त्याच्या ग्लब्जने एकही कॅच सोडला नव्हता. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल का? असा सवाल विचारला जातोय.

2/5

सरफराज खान

सरफराज खान याला अथक प्रयत्नानंतर सरफराजला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली होती. त्यानंतर आता सरफराजला बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली आहे. 

3/5

आकाश दीप

एकमेव टेस्ट सामना खेळलेल्या आकाश दीपला पुन्हा एकदा टीम इंडियाची दरवाजे उघडे झाले आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या कष्टाचं चीझ झालं आहे.

4/5

ऋषभ पंत

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची टीम इंडियामध्ये 21 महिन्यांनंतर एन्ट्री झाली आहे. अपघातानंतर ऋषभ पहिल्यांदाच कसोटी खेळेल. 

5/5

यश दयाल

युवा स्टार गोलंदाज यश दयाल याला मेहनतीचं फळ मिळालं असून त्याला टीम इंडियाकडून डेब्यूची संधी मिळणार आहे. आयपीएल आणि दुलीप ट्रॉफीमधील चांगल्या खेळीचं फळ त्याला मिळालंय.