खाली रस्ता तर वर अभयारण्य! एकही हॉर्न वाजणार नाही, मुंबईतून निघणार जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे

India Longest Expressway: 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वे आर्थिक राजधानी मुंबईहून राजधानी दिल्लीला जोडतो. हा रस्ता अनेक अर्थाने अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे.

राजीव कासले | Sep 12, 2024, 19:22 PM IST
1/8

खाली रस्ता तर वर अभयारण्य! एकही हॉर्न वाजणार नाही, मुंबईतून निघणार जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे

2/8

देशात रस्त्यांचं जाळं वेगाने पसरत आहे. देशातला कानाकोपरा एक्स्प्रेस वे, महामार्गाने जोडला जात आहे. काही ठिकाणी रस्ते डोंगरातून तर काही ठिकाणी जंगलातून जाणारे आहेत. पण देशातला एक महामार्ग असा आहे जो देशातलाच नाही तर जगातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वे आर्थिक राजधानी मुंबईहून राजधानी दिल्लीला जोडतो. या महामार्गामुळे 24 तासांचा प्रवास अवघ्या 12 तासांवर आला आहे. 

3/8

हा महामार्ग देशातल्या अनेक राज्यांना एकमेकांशी जोडतो. हा महामार्ग तयार करण्यासाठी 80 लाख टन सीमेंट, 15,000 हेक्टेर जमीन आणि 1 लाख कोटी रुपयांचा निधी लागला आहे. हा रस्ता अनेक अर्थाने अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे.

4/8

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग मानला जातो. सध्या आठ लेनचा असलेला हा रस्ता लवकरच 12 लेनचा बनवला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे हा आशियातला असा पहिला एक्स्प्रेस वे आहे ज्यात ज्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी ग्रीन ओव्हरपासची (Green Overpass) व्यवस्था करण्यात आली आहे.

5/8

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर गाड्यांचा कमाल वेग 120 किमी प्रति तास इतका आहे. महामार्गाबरोबरच या ठिकाणी इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित होत आहे.  दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेची पायाभरणी 9 मार्च 2019 रोजी झाली होती, पुढील वर्षी त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास आहे. या महामार्गाच्या बांधकामात 12 लाख टन स्टील वापरण्यात आलं आहे, जे 50 हावडा ब्रिजच्या बरोबरीचं आहे. एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या इंधनाच्या वापरात 32 कोटी लिटरची बचत होईल.

6/8

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे मध्ये  वन्य प्राण्यांसाठी ग्रीन ओव्हरपासची (Green Overpass) व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आठ लेनचे दोन बोगदे बनवण्यात आले आहेत. ज्यामुळे वन्य प्राणी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. पहिला बोगदा राजस्थानच्या मुकुंद्रा सेंक्चुरीच्या खाली तर दुसरा बोगदा माथेरान इको सेंसिटिव्ह झोनमध्ये बनवला जाणार आहे. मुकंद्रा आणि रणथंबोरमधून जाणाऱ्या भागाला सायलेंट कॉरिडॉर करण्यात आलं आहे. हा द्रुतगती मार्ग 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून जात असल्याने वाहनांचे हॉर्न आणि सायरनवर बंदी असणार आहे. या एक्स्प्रेस वेवर हॉर्नऐवजी सतार आणि शहनाईचे सूर ऐकू येणार आहेत. 

7/8

या एक्स्प्रेस वे वर  पेट्रोल पंप, मॉटेल, रेस्ट एरिया, रेस्टोरेंट्स, दुकानं,  एटीएम, पार्किंग, रिचार्ज स्टेशन्स, डॉरमेट्री, हॉस्पिटल्स, फूड कोर्ट, फ्यूल स्टेशन यासह 94 पद्धतीच्या सुविधा मिळणार आहेत. या संपूर्ण द्रुतगती मार्गावर 30 लेन टोलनाके उभारले जात आहेत. याठिकाणी वाहनांची प्रतीक्षा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी असेल. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 13 लाखांहून अधिक झाडे लावली जाणार आहेत. 

8/8

दिल्ली-मुंबई महामार्गावर 12 हेलिपॅड बांधण्याची तयारी सुरू आहे, ज्याचा उपयोग वैद्यकीय आपत्कालीन आणि लष्करी कामासाठी केला जाईल.  NHAI नुसार, सर्व 12 हेलिपॅड राजस्थानमध्ये बांधले जातील.