इंग्लंडच्या बॅझबॉलवर भारताचा 'JASBALL' पडला भारी, यशस्वीने ठोकलं द्विशतक

Yashasvi Jaiswal Double Century: टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विशाखापट्टणमच्या मैदानावर इतिहास रचला आहे.   

| Feb 03, 2024, 11:07 AM IST
1/7

इंग्लंडविरूद्ध दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालने तुफान फलंदाजी करत द्विशतक ठोकलंय.

2/7

यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि टेस्ट कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावलं.

3/7

यशस्वी जयस्वालने 290 चेंडूत 209 रन्सची खेळी खेळली. यशस्वी जयस्वालच्या टेस्ट कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी आहे.  

4/7

यशस्वी जयस्वालने 277 चेंडूत त्याचं द्विशतक पूर्ण केलं आहे.

5/7

भारतीय डावाच्या 102 व्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालने इंग्लंडचा ऑफस्पिनर शोएब बशीरच्या पहिल्या आणि सलग दुसऱ्या बॉलवर चौकार आणि षटकार ठोकून टेस्ट क्रिकेटमधील पहिलं द्विशतक झळकावलंय.

6/7

यशस्वी जयस्वाल यांना सोशल मीडियावर 'JASBALL' असं नाव देण्यात आलंय.

7/7

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी जयस्वालने ही कामगिरी केली आहे.