इंडिया आघाडीच्या 5 मागण्या; रामलीला मैदानावर विरोधकांची वज्रमुठ

विरोधी पक्षाने 'लोकशाही बचाओ रॅली' काढली. यावेली काही मागण्या देखील करण्यात आल्या. 

Mar 31, 2024, 23:11 PM IST

India alliance : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधक एकवटले. इंडिया आघाडीतले सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी या सभेत हजेरी लावत केजरीवालांच्या अटकेचा निषेध केला.

1/7

विरोधी पक्षाच्या 'लोकशाही बचाओ रॅली'मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसंच एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.   

2/7

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधकांची वज्रमुठ पाहायला मिळाली.  

3/7

भाजपची इलेक्टोरल बाँड्सद्वारे खंडणीवसुली आणि मनी लाँड्रिंग आरोपांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्ट देखरेखीखाली एसआयटी गठीत करावी. 

4/7

निवडणुकीच्या काळात विरोधी राजकीय पक्षांची आर्थिक गळचेपी करण्याची सक्तीची कारवाई ताबडतोब थांबवा. 

5/7

हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोघांना तात्काळ सोडलं पाहिजे. 

6/7

विरोधकांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जाणारी दबावाची कारवाई थांबवली पाहिजे. 

7/7

 निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत समान संधी सुनिश्चित केल्या पाहिजेत.